आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादरोड अचानक केला बंद, स्थानिकांसह वाहनचालकांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राममध्ये जाणाऱ्या रस्त्यांसह महामार्गावरील औरंगाबाद नाक्याहून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने स्थानिकांसह वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. हाकेच्या अंतरावर जाणाऱ्या नागरिकांना किमान चार किमीचा प्रवास करावा लागत आहे. कुठलीच अधिसूचना देता रस्ता बंद केल्याने पोलिसांवर प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
साधुग्राममध्ये भाविकांच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांपासून औरंगाबादरोड वाहतुकीसाठी बंद केला. कुठलाही रस्ता बंद करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. मात्र, अचानक रस्ता बंद केल्याने पोलिस प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा अारोप स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केला आहे.
परिसरात मोठे हॉस्पिटल आहेत. येथे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनादेखील मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने रुग्णांचे हाल झाले. औरंगाबादरोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्ता बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. तर नवीन वाहनचालकांना पुढे जाणारा रस्ता माहीत नसल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पर्यायी मार्ग
औरंगाबादनाक्याहून पुढे औरंगाबादरोडकडे जाता महामार्गाहून अमृतधाम, हनुमाननगरमार्गे नांदूर नाक्याहून औरंगाबादरोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग बंद
निलगिरीबाग ते औरंगाबादरोडमार्गे साधुग्राम रस्ता बंद केल्याने वाहनचालकांचे हाल झाले.