आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादरोड अखेर वाहतुकीस खुला, आमदारांच्या आयुक्तांना कानपिचक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस यंत्रणेने अचानक बॅरिकेडिंग टाकून गेल्या शुक्रवारी बंद केलेला औरंगाबाद महामार्गावरील स्वामीनारायण पोलिस चौकी ते निलगिरी बागेपर्यंतचा रस्ता स्थानिक रहिवाशांचा रोष आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी पोलिसांच्या मनमानीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देताच बुधवार (दि. ५) पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आमदार सानप यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करताच हा विषय मार्गी लागू शकतो, तर इंदिरानगर बोगदा खुला करण्याबाबत याच सत्ताधारी पक्षाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे सीमा हिरे यांनी वारंवार सांगूनही पोलिस जुमानत नसल्याने आमदार द्वयींच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.
साधुग्राममध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी औरंगाबादरोड अचानक बंद करण्यात आला होता. याबाबत पोलिसांकडून कुठलीही अधिसूचना अथवा माहिती देण्यात आलेली नसल्याने शेकडो वाहनचालकांची गैरसोय झाली. स्थानिक हजारो रहिवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून तक्रारी केल्यावर शनिवारी रविवारी दोन दिवसांसाठी रस्ता तात्पुरता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, सोमवारीही बॅरिकेडिंग कायम ठेवल्याने संतप्त रहिवाशांनी आमदार सानप यांच्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत सानप यांनी तत्काळ आयुक्त एस. जगन्नाथन यांना फोनद्वारे नागरिकांच्या भावनांची दखल घेत गर्दीच्या वेळीच हा रस्ता बंद करा, उर्वरित वेळेत रस्ता खुला करण्यात यावा, अन्यथा पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरून रहिवासी आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. रस्ता खुला करण्याचे आश्वासन देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील स्वामीनगर, लिंगायत सोसायटी, नांदूर नाका परिसर, जनार्दन स्वामीनगर, विदर्भ कॉलनीतील रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या.
महाजनांकडे तक्रार
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांना लोकांच्या भावना कळवून सिंहस्थासाठी आठ दिवस आधी ठराविक रस्ते बंद करा. परंतु, सरसकट रस्ते बंद करू नका, असे सांगितले.
- बाळासाहेब सानप, आमदार
चार किलोमीटरचा पडत होता फेरा
यापरिसरातील नागरिकांना चार किलोमीटरचे अंतर कापून अमृतधाम चौफुली, विडी कामगारनगरमार्गे मिरची हॉटेल कॉर्नरकडून औरंगाबादरोडकडे यावे लागत होते. शालेय वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा पालकांनाही मोठा वळसा घालून जावे लागत होते
बातम्या आणखी आहेत...