आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: पाण्याच्या उपलब्धतेच्या निकषानुसार ‘डीएमअायसी’मध्ये अाैरंगाबादला फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई तसेच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नाशिकमध्ये २३.१७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिल्यानेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेर (डीएमअायसी)च्या पहिल्या टप्प्यात नाशिक वगळले गेले.
 
विशेष बाब म्हणजे, नाशिकहून प्रसंगी पाणीपुरवठा केला जाताे, त्या अाैरंगाबादचा या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाला. २०१० साली तत्कालीन सरकारमधील काहींनी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळेच नाशिकची पिछेहाट झाली अाहे.

 शेंद्रा-बिडकीन परिसरात अाज जवळपास साडेसात हजार हेक्टर जमीन संपादित केली जात असून, हजाराे काेटींची गुंतवणूक देशी-विदेशी उद्याेग तेथे करीत अाहेत अाणि तेथील विकास झपाट्याने हाेऊ लागला अाहे. इकडे नाशिकमध्ये गेल्या १६ वर्षांत एकाही माेठ्या उद्याेगाने गुंतवणूक केलेली नाही हे वास्तव अाहे.
 
मुंबई-पुणे-नाशिक विकासाचा सुवर्णत्रिकाेण मानला जात हाेता, मात्र या त्रिकाेणात नाशिकची जागा अाैरंगाबादने घेतली असून नवा काेन तयार झाल्याचे बाेलले जातेय. या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेरमध्ये सिन्नर तालुक्यातील सुमारे ३२३० हेक्टर जमिनीचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यात ताे विकसित हाेण्याचे प्रस्तावित अाहे. लाेकप्रतिनिधींनी सुचविल्यानुसार काही ठिकाणची जमीन वगळावी याकरीता मंजुरीही मिळाली अाहे.
 
पाणी उपलब्ध होत नसल्याचा अहवाल
सिन्नर येथील माैजे बारागाव पिंप्री, पाटपिंपरी, देशवंडी, साेनांबे-काेनांबे, हरसुळे, पास्ते व खपराळे गावच्या हद्दीतील ५ हजार हेक्टर एवढे क्षेत्र अंतिमरित्या डीएमअायसीकरिता प्रस्तावित हाेते. या क्षेत्राकरिता अावश्यक असलेले २३.१७ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अंतिम मागणीसाठी पाटबंधारे विभागाकडे गाेदावरी व दारणा समूहातून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी एमअायडीसीने केली हाेती. मात्र, या समूहातून ९५ टक्के विश्वासार्ह पाणी उपलब्ध हाेऊ शकत नाही असे पत्र २७ अाॅक्टाेबर २०१० राेजी पाटबंधारे विभागाने (पत्र जा. क्र. ७९३१) एमअायडीसीला कळविले.
 
नदीजाेड प्रकल्पाकडे बाेट
सिन्नर मेगा इंडस्ट्रियल पार्कसाठी पाणी उपलब्ध हाेण्याच्या दृष्टिकाेनातून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन एमअायडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे हे अारक्षण भारत सरकारच्या नदीजाेड प्रकल्पातून उपलब्ध हाेऊ शकेल, असे सांगण्यात अाले हाेते.
 
उद्याेगमंत्र्यांची बैठक हाेऊन झाली तब्बल दाेन वर्षे...
उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ११ मे २०१५ राेजी महाराष्ट्र अाैद्याेगिक विकास महामंडळ (एमअायडीसी) अाणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली हाेती, यात नाशिक येथील डीएमअायसीच्या प्रकल्पासाठी पाण्याची उपलब्धता कशी करता येईल याबाबतच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात अाल्या हाेत्या. मात्र, अाज दाेन वर्षे हाेत अाली तरी याबाबत काही ठाेस पुढे अालेले नाही.
 
नाशिक एमअायडीसी सीईअाेंनी केला हाेता गाैप्यस्फाेट...
उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर मधील बैठकीत नाशिकमध्ये पाणी नसल्याने डीएमअायसीच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश हाेऊ शकला नाही, असा गाैप्यस्फाेट एमअायडीसीचे तत्कालीन सीईअाे भूषण गगरानी यांनी केला हाेता. याच कार्यक्रमात शाॅर्ट फिल्म निमाकडून सादर करण्यात अाली हाेती. त्यात जिल्ह्यातील मुबलक पाणीसाठ्यावरही भर दिलेला हाेता, हे विशेष.
 
येथून उपलब्ध हाेऊ शकेल पाणी
गारगाई-वैतरणा-देवदरी लिंक प्रकल्पातून ७ हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध हाेऊ शकणार अाहे. यातून उद्याेगांकरिता २५०० दशलक्ष घनफूट उपलब्ध करून दिले जाऊ शकेल. दमणगंगा-गाेदावरी (एकदरे) लिंक या प्रकल्पातून ५ हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध हाेईल त्यातून १५०० दशलक्ष घनफूट उद्याेगांकरिता देता येऊ शकेल.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, मेक इन नाशिकच्या पार्श्वभूमीवर अहवाल कळीचा
 
बातम्या आणखी आहेत...