आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रम शुक्रवारपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘लेखक तुमच्या भेटीला’ या ज्योती स्टोअर्सच्या उपक्रमाद्वारे साहित्यरसिकांना यंदाही मोठी पर्वणी साधता येणार आहे. यंदा या उपक्रमाला शुक्रवारपासून (दि. २) सुरुवात होत आहे. नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांत आठ व्याख्याने होणार आहेत. यंदा व्याख्यानाच्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या साहित्य मंथनाच्या उपक्रमात नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक वसंत खैरनार यांनी केले आहे.