आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांना मिळाला 3000 रूपये दिवाळी बोनस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सुशिक्षित रिक्षाचालक विजय निरभवणे यांनी पुढाकार घेऊन ‘रिक्षाचालक बचतगट’ स्थापन केला. बचतगटाच्या सदस्यांना प्रत्येकी 3000 रुपयांच्या बोनस देण्यात आला.

दहा रुपये रोज : रोजच्या कमाईतून कुटुंब पोसताना रिक्षाचालकांना अडचणी येतात. त्यामुळे रिक्षाचालक बचतगटाची स्थापना केली. त्यात 25 सदस्य असून, प्रत्येकाकडून रोज दहा रुपये जमा केले जातात. त्यातूनच दोन टक्के व्याजदराने मदत केली जाते. मासिक अथवा साप्ताहिक हप्त्याने कर्ज वसूल केली जाते. व्याजाच्या पैशांतून प्रत्येकाला तीन हजार रुपये बोनस मिळाले.

व्यसनींना बंदी : बचत गटाचे सदस्य होण्यासाठी नियमावली आहे. जुगारी, दारू व इतर प्रकारचे कोणतेही व्यसन असलेल्या चालकाला सदस्य केले जात नाही. बचत गटामुळे रिक्षाचालकांना मदतीचा हातभार लागला असून, ऐनवेळी अडचणींच्या काळात बचतगटाचा आधार मिळतो, असे या रिक्षाचालक बचतगटाचे संस्थापक विजय निरभवणे यांनी सांगितले.