आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद रिक्षाचालकांचा; तारांबळ पालकांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा व व्हॅनचालकांनी सोमवारी पुकारलेल्या संपामुळे शहर परिसरातील पालकांची प्रचंड गैरसोय झाली. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून महिनाभरात तिसर्‍यांदा विद्यार्थी वाहतूकदारांनी संप केल्याने पालकवर्गातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, आरटीओ व वाहनचालकांच्या वादातून उद्भवलेल्या या संपामुळे पालक व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप भोगावा लागला. सोमवारी संपावरील चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणार्‍या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा आणि व्हॅन चालकांनी संप पुकारला. यामुळे पालकांची तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वच शाळांमध्ये पाहावयास मिळाले. संपाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहनचालकांच्या संपामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्यासाठी तसेच आणण्यासाठी शाळेच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती.

आरटीओ विभाग आणि वाहनचालक यांच्या वादाचा फटाक मात्र विद्यार्थी तसेच पालकांना बसला. वारंवार होणार्‍या अशा घटनांमुळे पालकांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल सिडकोतील संतप्त पालकांनी केला. नाशिकरोडला बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. बहुतेक पालकांना पाल्यांना शाळेत सोडणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम दिसून आला. रिक्षा, व्हॅनची गर्दी नसल्याने शाळांसमोरील परिसर मोकळा होता. नाशिकरोडमधील चिालक सेंट झेव्हियर्स शाळेसमोरुन विद्यार्थी वाहतुक संघटनेचे नाशिकरोड अध्यक्ष किरण डहाळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित भालेकर मैदानाकडे मोर्चासाठी रवाना झाले.

पालकांकडून रोष व्यक्त
धावपळ करावी लागली
घरातील कामे टाकून धावपळ करीत मुलाला सोडण्यासाठी शाळेत जावे लागले. शाळा सुटेपर्यंत शाळेच्या आवारात थांबून त्याला परत घेऊन आलो. या धावपळीत अर्धा दिवस निघून गेला. त्यामुळे आजचे काम बंद राहिल्याने नुकसान झाले. सुरेश सूर्यवंशी, राणाप्रताप चौक

कामावर टाकली सुटी
मी इलेक्ट्रानिक्सचे कामे करतो. मला कामानिमित्त नेहमी बाहेरच राहावे लागते. परंतु, सोमवारी मुलाची रिक्षा बंद असल्याने मलाच त्याला शाळेत सोडविण्यासाठी जावे लागले. दुपारी 12 वाजता शाळा सुटणार असल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यासाठी जावे लागले. त्यामुळे मला कामावर जाता आले नाही. कैलास गोडसे, राणाप्रताप चौक