आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या आश्वासनानंतर श्रमिक सेनेचे बेमुदत उपोषण स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रादेशिक परिवहन व शहर वाहतूक पोलिस अधिकार्‍यांनी जाचक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्याने बेमुदत उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आल्याचे राष्ट्रवादीप्रणीत श्रमिक रिक्षा, टॅक्सी चालक- मालक सेनेने जाहीर केले आहे.

याबाबत श्रमिक सेनेतर्फे सांगण्यात आले की, महिन्यापासून नाशिक-कसारा प्रवासी वाहतूक बंद आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी श्रमिक सेनेने द्वारका ते घोटी प्रवासी सेवा सुरू केली. परंतु, आरटीओ व पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने त्याच्या निषेधार्थ मुंबई नाका कॅबिनसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर संबंधित अधिकार्‍यांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस आरटीओ अधिकारी, तसेच मामा राजवाडे, अजय बागुल, भगवंत पाठक, सईद पठाण, नासीर पठाण आदी उपस्थित होते.