आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोलचे दर उतरले, रिक्षा भाडेवाढ तीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक । पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर शेअर रिक्षांनी भाडेवाढ केली. मात्र पेट्रोलच्या दरात कपात केल्यानंतरही रिक्षाचालकांनी भाडे कमी केले नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॉलेजरोड, पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर जाण्यासाठी शेअर रिक्षांचे किमान दर 10 रुपये झाले आहेत.
आता बसनेच जातो
याआधी काही वेळा शेअर रिक्षाने जायचो. आता मात्र बसनेच प्रवास परवडतो. रोजचे दहा रुपये वाढीव म्हणजे किमान तीनशे रुपये महिन्याचे जास्त खर्च होतात. रिक्षाची भाडेवाढ कमी केली पाहिजे. मिलिंद कांबळे
भाडेवाढ कमी का होत नाही? - पेट्रोलचे दर कमी झाल्यावर भाडेदेखील कमी व्हायला पाहिजे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सुमित सोनवणे, नागरिक
प्रत्येकवेळी वाढते रिक्षांचे भाडे - प्रत्येक वेळी रिक्षाचे भाडे वाढविले जाते. ते कमी करण्याबाबत कुणीच बोलत नाहीत. दरवाढ सामन्यांच्या माथी मारली जाते. रश्मी वरखेडे, गृहिणी