आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आता काेणत्याही वेळेत येऊ शकते इच्छितांच्या दारापुढे रिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगराचा वाढता विस्तार अाणि रात्री-अपरात्री काेणत्याही क्षणी वाहनाची गरज भासल्यास ते त्वरित उपलब्ध करून देण्याची सुविधा एका अाॅटाे कंपनीने उपलब्ध करून दिली अाहे. काेणत्याही नागरिकाने जुगनू अाॅटाे नावाचे अॅप डाउनलाेड करून घेतल्यास त्याला कधीही अवघ्या ते मिनिटांत रिक्षा हव्या त्या जागेवर उपलब्ध हाेऊ शकते.

चंडिगढ पासून प्रारंभ झालेल्या या अॅपची सुविधा देशातील १७ शहरांमध्ये उपलब्ध अाहे. त्यात महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर गत महिन्यापासून ही सुविधा नाशिकमध्येदेखील उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. शहराच्या काेणत्याही भागातील नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या रिक्षात मीटरनुसार भाडे अाकारले जात अाहे.

..असे करावे अॅप डाउनलाेड : माेबाइलमधीलप्ले स्टाेअरमध्ये जाऊन जुगनू अाॅटाे हे अॅप डाउनलाेड करून इन्स्टाॅल करावे. त्यानंतर तिथे साइनअप केल्यावर तुमचे नाव, इ-मेल, पासवर्ड अाणि प्राेमाेकाेड येताे. बस इतके केले, तरी ग्राहकांच्या माेबाइलवर येणाऱ्या जुगनू अाॅटाेच्या सिम्बाॅलवर टॅप केले, तरी त्वरित संबंधित ग्राहकाला नजीकच्या रिक्षाचालकाकडून माेबाइलवर काॅल येऊन ताे किती मिनिटांत उपलब्ध हाेइल, ते सांगून ग्राहकाला अपेक्षित जागेवर पाेहाेचताे.

अत्यंत चांगला प्रतिसाद
^या उपक्रमास नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद लाभला अाहे. राहुल अहिरे, रिक्षाचालक

रात्री-अपरात्री उपलब्ध झाल्यास खूप साेयीस्कर
^सामान्य नागरिकांना काेणत्याही क्षणी वाहनांची गरज पडते. अशा वेळी रिक्षासारखे हक्काचे वाहन रात्री-अपरात्री उपलब्ध झाल्यास खूप साेय हाेते. या अॅपमुळे रिक्षा उपलब्ध हाेणे शक्य झाल्याने माेठी साेय झाली अाहे. संदीप दाणी, नागरिक,पंचवटी

हा उपयुक्त ठरणारा अॅप डाउनलाेड करताना त्यातील प्राेमाेकाेडसमाेर एनए ३३ असे टाकल्यास नाशिकच्या काेणत्याही ग्राहकाला पहिली १०० रुपयांपर्यंतची राइड माेफत देण्याची सुविधा उपलब्ध केली अाहे. नाशिकमधील हजार रिक्षाचालक या उपक्रमात सहभागी झालेले अाहेत.

सध्या १४ रुपये मीटरडाउन अाणि त्यानंतरचे प्रत्येक किलाेमीटर १४ रुपये याप्रमाणे शुल्क अाकारणी हाेते. पण, या प्रकारात २० रुपये मीटरडाउन अाणि त्यापुढील प्रत्येक किलाेमीटरमागे अवघे रुपये शुल्क अाकारले जाते. मात्र, या प्रकारात रिक्षा सुरू झाल्यापासून इच्छित स्थळी पाेहाेचण्यासाठी लागलेल्या वेळेप्रमाणे प्रतिमिनिट रुपया शुल्कदेखील अाकारले जात असले, तरी ते प्रतिकिलाेमीटरच्या हिशेबापेक्षा कमीच हाेते.