आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांची सेवा सिंहस्थात साैजन्याची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात तसेच त्यानंतरही कायमस्वरूपी शहरातील रिक्षाचालक भाविकांशी तसेच शहरातील प्रवाशांशी साैजन्याने वागणार असल्याची ग्वाही रिक्षाचालक संघटनेतर्फे देण्यात अाली अाहे. रिक्षाचालकांना मेपासून गणवेश आणि ओळखपत्र, बॅज-बिल्ला सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन कार्यालयात शनिवारी रिक्षाचालक संघटना, नाशिक सिटिझन फोरम यांच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला.

कुंभमेळ्यामध्ये देश-िवदेशातून माेठ्या संख्येने भाविक नाशिक शहरात येण्याची शक्यता अाहे. या काळात सर्वच व्यावसायिक अतिरिक्त शुल्क आकारतात. यास रिक्षाचालकही अपवाद नाहीत. कुंभमेळ्यात भविकांची रिक्षाचालकांकडून लूट हाेण्याची शक्यता असते. तसेच, रिक्षात अतिरिक्त प्रवासीही बसवले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब उचित नसल्याने असे प्रकार घडू नयेत, यासाठी परिवहन विभागाने सिटिझन फोरम, रिक्षाचालक संघटना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत मेपासून रिक्षाचालकांना गणवेश आणि बिल्ला जवळ बाळगणे अनिवार्य केलेे आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सूचना मांडल्या
*मेपासून रिक्षाचालकांना गणवेश परिधान करणे बॅज-बिल्ला प्रदर्शित करणे अनिवार्य.
*सुरक्षेच्या दृष्टीने फ्रंट सीट बसवू नये, याकरिता संघटनेने रिक्षाचालकांचे प्रबोधन करावे.
*दोषी अाढळल्यास कार्यवाही केली जाण्याचे संकेत.
*रिक्षांवरील अनधिकृत फलक जाहिरात बाेर्ड, िस्टकर्स काढावे अथवा त्याबाबत अारटीअाेची परवानगी घ्यावी.
*परिवहन विभागाकडून ओळखपत्र देण्यात येणार त्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार
*ओळखपत्र गणवेशावर लावणे बंधनकारक
*संघटना पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे प्रबाेधन रिक्षाथांबे येथे जाऊन करावे, तसेच रेडिअाेद्वारे अावाहन करावे.

ओळखपत्र अनिवार्य
रिक्षाचालकांनापरिवहन विभागाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये रिक्षाचालकाचे नाव, पत्ता आणि इतर सर्व माहिती दिली जाणार आहे. मेपर्यंत ओळखपत्रासाठी अर्ज करावे. जीवनबनसोड, प्रादेशिकपरिवहन अधिकारी, नाशिक

संघटनाकरणार प्रबोधन
रिक्षाचालकांनासंघटना मार्गदर्शन आणि प्रबोधन करणार अाहे. कुंभमेळ्यात तसेच त्यानंतरही भाविक प्रवाशांबराेबर साैजन्याची वागणूक िरक्षाचालकांकडून मिळेल. तसेच, प्रशासनास सहकार्य करण्यात येईल.- भगवानपाठक, कार्याध्यक्ष,श्रमिक रिक्षाचालक संघटना
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना योग्य मार्गदर्शन केल्यास चालकांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा काही चालकांनी व्यक्त केली.