आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी पन्नास वर्षांमध्ये जगात होणार मोठे बदल- निळू दामले यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आपल्या देशाची सांस्कृतिकदृष्ट्या असलेली गरिबी जाईल, असे मला वाटत नाही. मात्र, आगामी 50 वर्षांत जगात मोठे बदल होणार आहेत. कोणत्याही स्मार्ट मटेरिअल्सचा या वेळी अभाव राहणार नाही. आगामी काही वर्षांत शेती मर्यादित उपयोगांवर आधारित राहणार नसून, देशातील ९० टक्के लोकसंख्या शहरात राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ‘सुकाळ-दुष्काळ’ या विषयावरील पुस्तकासंदर्भात कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे रविवारी त्यांचे चर्चासत्र झाले. त्या वेळी ते बोलत होते. विविध देशांत 1990 नंतर इंटरनेटमुळे झालेले बदल आणि अनेक समस्यांमधून चीन, दक्षिण कोरिया इथिओपिया या देशांची वाटचाल, अशा विविध बाबींचा संदर्भ या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
दामले म्हणाले की, माझ्या पुस्तकाच्या प्रथम सत्रामध्ये नेहमीच सरकारच्या नावाने रडत बसणाऱ्या, सरकारकडून ही सुविधा मिळणे गरजेचे आहे, सरकारने हे केले पाहिजे, असे सांगणाऱ्या जुन्या मंडळींचे वर्णन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात १९६०-१९८० यादरम्यान दुष्काळ सोडून ऐश्वर्यात गेलेली माणसे आणि सगळेच लोक ऐश्वर्याकडे जाऊ शकतात, असे वर्णन करण्यात आले आहे. या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाद्वारे मी असा निष्कर्ष काढला आहे की, भारत हा केवळ दु:खावर प्रेम करणारा देश आहे. येथे निर्माण केलेली प्रत्येक व्यवस्था ही केवळ दु:ख वाढविण्यासाठीच आहे. आपल्या देशात राजकारणापासून ते सामाजिक सगळ्याच कार्यामध्ये फार मोठा घोळ आहे, असेही या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकाची प्राथमिक तयारी इचलकरंजी गावाचा अभ्यास करून केली आहे.
टेक्नॉलॉजी राहते नेहमीच बंडखोर...
जगातीलविविध देश मोठ्या प्रमाणात प्रगतिपथावर आहेत. आपल्या देशातील लोक नेहमीच विविध गोष्टींमध्ये अडकत जातात. परंतु, टेक्नॉलॉजी ही नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात असते आणि टेक्नॉलॉजी नेहमीच बंडखोर असते, असा या पुस्तकाचा निष्कर्ष असल्याचे मतही या वेळी प्रतिपादित झाले.