आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: सिडको,इंदिरानगर भागात नायलॉन मांजाविरोधात नागरिक जागृत झाले असून शाळेत विद्यार्थ्यांना मांजा वापरण्याची शपथ दिली जात आहे. काही नागरिकांनी पोलिसांना निवेदन देत मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अनेक नागरिकांनी मांजा वापरण्याचा निर्णय घेतला असून मकर संक्रांतीच्या दिवशी साध्या मांजाने पतंग उडवून या उत्सवाचा आनंद साजरा करण्याचा निश्चय केला आहे. शहरात अन्य ठिकाणीही तरुण, सामाजिक संस्थांनी या मांजाविराेधात जागृती केली. 

मनपा शाळा ३१ मध्ये शपथ 
कामटवाडेयेथील महापालिका शाळा ३१ मधील विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा वापरण्याची शपथ घेतली. मुख्याध्यापिका बीना जाधव, बाळासाहेब आरोटे, शिरसाठ, पाटील, हिरे, भोळे, परदेशी, पवार, बच्छाव आदी शिक्षकांनी मुलांना ‘नायलॉन मांजा स्वतः वापरणार नाही कुणाला वापरू देणार नाही’, अशी शपथ दिली. मुलांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
इंदिरानगर, वडाळा गाव भागात अनेक बेजबाबदार पतंग विक्रेते नायलॉन मांजा विकत आहेत. त्यामुळे या भागात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पशु-पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेथ. सामाजिक कार्यकर्ते गौतम बागुल, निवृत्ती नेटारे, संजू खोडे, योगेश सदावर्ते, विक्की सोळसे, शकिरा पठाण यांनी इंदिरानगर पोलिसांना निवेदन दिले. यात नायलॉन मांजा विक्री खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली