आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता विद्यार्थीच देतील रस्ता सुरक्षेचे धडे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्ता सुरक्षिततेसह वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी नाशिक फर्स्ट शहर वाहतूक पाेलिस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १२) सकाळी ते दुपारी या वेळेत शालेय विद्यार्थी वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देणार अाहेत. यासाठी चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात अाले अाहे. रस्ता सुरक्षा जागृती अभियानांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी पाेलिस उपायुक्त विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रस्ता सुरक्षा पंधरवड्यात लाेकांमध्ये रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व वाहतूक नियम पाळण्याची गरज याबाबत जागृती केली जाणार अाहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे अाैचित्य साधून नाशिक फर्स्टने हा उपक्रम राबविण्याचे नियाेजन केले अाहे. प्रत्येक सिग्नलच्या जवळपासच्या शाळांची यासाठी निवड करण्यात अाली अाहे. प्रत्येक सिग्नलवर विद्यार्थी रस्ता सुरक्षा फलक दाखवून नागरिकांचे प्रबाेधन करणार अाहेत.

दुचाकीवर हेल्मेट घालावे, चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावला पाहिजे, असे संदेश दाखविले जातील. वाहतूक नियमांच्या दृष्टीने बंद सिग्नल सुरू करतानाच झेब्रा पट्टेदेखील मारण्यात आले आहेत. विद्यार्थी स्वयंसेवकांना नाशिक फर्स्ट, वाहतूक पाेलिस लाॅर्डचे लाेगाे असलेले टी-शर्ट टाेप्या दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचीही अभियानात काळजी घेण्यात अाली असून, प्रत्येक विद्यार्थ्याचा एकदिवसीय विमा उतरविण्यात अाला अाहे. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी डाॅ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय हाॅस्पिटलचे डाॅक्टर्स प्रत्येक सिग्नलवर उपस्थित राहाणार अाहेत. या उपक्रमात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार अाहे.

पत्रकार परिषदेला सहायक पाेलिस अायुक्त प्रशांत वागुंडे, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक एम. एम. बागवान, लाॅर्ड कंपनीचे बालन, उपक्रमाचे मुख्य समन्वयक सुरेश पटेल, सहसमन्वयक डाॅ. सुनीता देशमुख, नाशिक फर्स्टचे कार्यकारी संचालक देवेंद्र बापट, जनरल सेक्रेटरी मिलिंद जांबेटकर, सीमा बापट अादी उपस्थित हाेते.

अाजवर हजार २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
^शहरातील ३१ सिग्नल्सवर आठवी नववीचे विद्यार्थी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहतूक नियम सांगतील. मुलांनी हे नियम माेठ्यांना सांगितल्यास ते परिणामकारक ठरतील, ही या उपक्रमामागची भूमिका अाहे. संस्थेने अाजवर हजार २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. अभय कुलकर्णी, अध्यक्ष,नाशिक फर्स्ट

रस्ता अपघात टाळण्यासाठी जागृती
^रस्ता अपघात टाळण्याच्या दृष्टिकाेनातून विद्यार्थी वाहतुकीचे नियम सांगणार अाहेत. अभियानात विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे काम वाहतूक पाेलिस करतील. विद्यार्थ्यांना प्राेत्साहन मिळावे अाणि वाहनचालकांनाही वाहतुकीचे नियम कळावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात अाहे. विजय पाटील, पाेलिसउपायुक्त