आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयमा इंडेक्स देणार उद्योगांना बुस्टर डोस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी सेवक आणि सेवा संस्था पुरस्कार सोहळा, राज्यस्तरीय विभागीय नियोजन बैठक आणि कृषी साहित्य संमेलन असे अनेक कार्यक्रम असल्याने राज्यपालांसह जवळपास डझनभर मंत्री शुक्रवारी नाशकात येणार आहेत. एकाच व्यासपीठावर एवढे मंत्री येणार असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे.

सकाळी 8.30 वाजता नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन भवन येथे विभागाची राज्यस्तरीय वार्षिक नियोजनाची बैठक होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित, राज्यमंत्री राजेंद्र गावित, राजेंद्र मुळक, विभागातील पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीस उपस्थित राहाणार आहेत. त्यानंतर दादासाहेब गायकवाड सभागृहात 11 वाजता आदिवासी सेवक पुरस्काराचे वितरण राज्यापालांच्या हस्ते होणार असून, त्यास उपमुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्री उपस्थित राहाणार आहे. डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या कृषी साहित्य संमेलनासाठी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांची नाराजी : आदिवासी विकास विभागाने पुरस्कार वितरण समारंभासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत तापी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि माजी राज्य मंत्री असलेले आमदार ए. टी. पवार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचे नाव नाही. गेल्या 30 वर्षांपासून आदिवासींच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या आमदारांचे आणि आदिवासी राखीव जागेवरील जिल्हा परिषद अध्यक्षांचेच नाव नसल्याने अध्यक्षा जयर्शी पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी दिनाच्याही कार्यक्रमप्रसंगी असाच प्रकार घडला होता. त्याची पुनरावृत्ती झाल्याने आयुक्तांनी जाणीवपूर्वक नाव टाळत राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप जयर्शी पवार यांनी केला आहे.

आज होणार उद्घाटन
प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11 वाजता एचएएलचे महाव्यवस्थापक (विमान उत्पादन विभाग, नाशिक) दलजित सिंग यांच्या हस्ते आणि एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. 27 जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 पर्यंत प्रदर्शन सुरू असेल.

हजारो कोटींची व्यवसाय संधी
हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडकडून ‘इंडिनायजेशन’ या संकल्पनेतून हजारो कोटींचा व्यवसाय भारतात आणण्यात येत आहे. यासाठी आवश्यक साहित्यासाठीचे आउटसोर्सिंग आणि व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रक्रिया प्रदर्शनात होईल व त्याचा स्थानिक उद्योजकांना लाभ होणार आहे. धनंजय बेळे, चेअरमन, आयमा इंडेक्स

पॅगोडाची संकल्पना अन् आंतरराष्ट्रीय लूक असलेले प्रदर्शन
शहरात भरलेल्या विविध प्रदर्शनांकडे पाहता खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय लूक असलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे. प्रशस्त डोम व प्रत्येक स्टॉलला तीन बाजूने प्रदर्शनीय जागा ठेवण्यात आली आहे. मोकळेपणाने फिरता येईल, अशी रचना त्यात आहे. पहिल्यांदाच ‘पॅगोडा’ पध्दतीच्या स्टॉलची संकल्पना आणली आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार
या प्रदर्शनाचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे येथे भेट देणार्‍या शहरातील उद्योजक व व्यावसायिकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार आहे. जेणेकरून या नोंदणीचा उद्योजकांना त्यांच्या उद्योग व व्यवसायाच्या विस्तारासाठी भविष्यात उपयोग होऊ शकेल. सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा

नाशिकसाठी 110 कोटी वाढवून मिळण्याची शक्यता
राज्यस्तरीय नियोजन बैठकीत नाशिकसाठी चालू वर्षाच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षासाठी 110 कोटी वाढवून मिळण्याची शक्यता आहे. चालू वर्षासाठी 250 कोटी रुपयांचा सर्वसाधारण उपयोजनांसाठी निधी मंजूर आहे. आदिवासी उपयोजनांसाठी 370 कोटींची मंजूरी आहे. त्यात सर्वसाधारण उपयोजनांसाठी वाढीव 80 कोटी म्हणजे एकू ण 330 कोटींची मागणी केली आहे. तसा प्रस्तावही प्रशासनाने तयार केला असून त्यास मान्यता आज मिळण्याची शक्यता आहे. आदिवासी उपयोजनांसाठी 402 कोटी म्हणजे 32 कोटीची वाढीव मागणी यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे.