आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.Pharm News In Marathi, Online Admission, Divya Marathi, Pune

‘बी.फार्म’साठी विद्यार्थ्यांना गाठावे लागेल पुणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी (बी. फार्म) प्रथमच घेण्यात येत असलेल्या स्वतंत्र प्रवेशप्रक्रियेसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 20 व 21 एप्रिल रोजी होणारी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया ही विद्यार्थ्यांना सोयीस्कर होण्याऐवजी ती अडचणीची ठरणार असून, नाशिकच्या बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी थेट पुण्याचे केंद्र गाठावे लागणार आहे.


ऑनलाइनसाठी शहरात केंद्र असतानाही पुण्याचे केंद्र मिळाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, शहरातच केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणार्‍यांसाठी पुढील प्रवेशाकरिता ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया परीक्षा बंधनकारक राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला.
अप्लिकेशन किट खरेदी एआरसी सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यांना दि. 15 एप्रिल रोजी हॉल तिकीट प्राप्त झाले आहे. परंतु, हॉल तिकिटावर जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र हे पुण्याचे देण्यात आले आहे.


विद्यार्थी नोंदणी
802 मविप्र फार्मसी महाविद्यालय
300 पंचवटी फार्मसी विद्यालय
200 ब्रम्हा व्हॅली महाविद्यालय
10 सपकाळ नॉलेज हब फार्मसी विद्यालय


अशी होईल परीक्षा
ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया ही परीक्षा तीन विभागांत होणार असून, त्यासाठी दोन व तीन तासांची वेळ आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा होईल. 20 व 21 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर दिलेल्या केंद्रांवर परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेचा निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.


गैरसोय होणार
‘बी. फॉर्म’साठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरताना नाशिक केंद्र मिळावे, असा पर्याय दिला होता. तसेच दुसरे प्राधान्य धुळे केंद्राला दिले होते. परंतु, हॉल तिकीट उपलब्ध झाले असून, त्यावर पुण्याचे कोथरूड येथील केंद्र परीक्षेसाठी मिळाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुण्याला जाऊन परीक्षा देणे गैरसोयीचे ठरणार आहे. यासाठी खर्च येणार तो वेगळाच. त्यामुळे या परीक्षेसाठी स्थानिक केंद्राचा पर्याय यंत्रणेनेने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पूजा बागुल, विद्यार्थिनी, कळवण


परीक्षार्थींना आर्थिक भुर्दंड पडणार
फार्मसीच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी स्थानिक केंद्र मिळणे क्रमप्राप्त असताना नाशिकच्या विद्यार्थ्यांना पुण्याचे केंद्र मिळाले आहे. त्यामुळे तेथे जाण्या-येण्याचा व दोन दिवस राहण्याचा खर्च करावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. भाग्यश्री पवार, विद्यार्थिनी