आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी. लिब. परीक्षा देऊनही गैरहजर असल्याचा शेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिक्षणापासूनवंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गोंधळ उडाला असून, परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांना निकालात चक्क गैरहजर असल्याचा शेरा देण्यात आला आहे. परीक्षा विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे विद्यापीठाचा मुक्त कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने मे २०१५ मध्ये बी. लिब या अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली. त्यात शहरातील १२ विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठीच्या ओळखपत्रावर अहमदनगर येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी नाशिक येथील केंद्र समन्वयकांशी संपर्क साधला. त्यांनी बीवायके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यास सांगितले. त्यानुसार ते १८ मेदरम्यान परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल नुकताच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला असून, या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही चक्क गैरहजर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असून, मुक्त विद्यापीठाच्या अशा गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने परीक्षेतील अशी पुनरावृत्ती टाळतानाच, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
आमचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

परीक्षेचेकेंद्र बदलण्यात आल्याने स्थानिक परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. या विषयीची माहिती समन्वयकांना माहिती देण्यात आली होती. मात्र, तरीही निकालामध्ये गैरहजर दाखविण्यात आल्याने वर्ष वाया जाण्याची भीती आहे. विद्यापीठाने निकालातील चुकांची दुरुस्ती करावी. शेखतरनूम्म, विद्यार्थिनी

नुकसान होणार नाही; विद्यार्थ्यांना तक्रारींची संधी
मुक्त विद्यापीठातर्फे १४६ अभ्यासक्रमांसाठी तब्बल साडेसहा लाख विद्यार्थी प्रविष्ट होते. परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात काही विद्यार्थ्यांचे निकालात चुका झाल्या असतील, तर त्यांना तक्रार करण्याची संधी असून, येत्या २१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झालेल्या संकेतस्थळावर ग्रीव्हन्स या पर्यायामध्ये पीआरएन क्रमांक, परीक्षा क्रमांक, नाव, अभ्यासक्रमाची माहिती, तक्रारीचा तपशील नोंदवायचा आहे. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेऊन २८ जुलैला दुरुस्ती करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. अर्जूनघाटुळे, परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...