आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बी. फार्मसी प्रवेश रखडले, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आैषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी फॅसिलिटेशन सेंटरद्वारे नोंदणी केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन अनेक दिवस उलटले असूनही अद्याप पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रमावस्था असून विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांकडे विचारणा होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने फार्मसी प्रवेशासाठी एआरसीची अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. तंत्रशिक्षण विभागातर्फे व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली प्रवेशप्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील आैषधनिर्माणशास्त्र शाखेच्या प्रथम वर्षाकरिता प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर फार्मसी महाविद्यालयांत फॅसिलिटेशन सेंटर सुरु झाले अाहे.विद्यार्थ्यांनी एफसी सेंटरवर नोंदणी केली. परंतु, पुढील प्रवेशाचे एअारसी सेंटरद्वारे प्रवेश निश्चित करण्यासाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. फँसिलिटेशन सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची विहित मुदत होती. त्यांतर २८ जून रोजी मेरिट लिस्टही जाहीर झाली. त्यानंतर सात ते आठ दिवस उलटूनही एआरसी प्रवेशाची अधिसूचना जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रमावस्था अाहे.
बातम्या आणखी आहेत...