आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोलपांच्या पुत्राला शिर्डीची उमेदवारी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार, माजी मंत्री बबनराव घोलप यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की पक्षावर आली. सोमवारी नाशकात आलेले उद्धव ठाकरे नव्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. मात्र, नेमका हाच मुहूर्त साधून आमदार घोलप यांचे पुत्र योगेश यांची लाँचिंग करण्यात आल्याने उमेवारीचा ‘वारसा’ योगेशकडे सोपवला जाणार असल्याचीच चर्चा होती.

आमदार घोलप यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली असून त्याबाबतचा निर्णय येत्या एक -दोन दिवसांत लागणार असल्याने उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय त्यानंतरच घेतला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. आ. घोलप यांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जागेवर पुत्र योगेश आणि मुलगी नयना घोलप-वालझाडे यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे. एरवी शिवसेनेच्या बैठकींना अनुपस्थित राहणारे घोलप कुटुंबातील हे सदस्य सोमवारच्या बैठकीला मात्र आवर्जून उपस्थित होते. दुसरीकडे स्वत: बबनराव घोलप यांची मात्र अनुपस्थिती होती.

काँग्रेसमध्येच राहणार : रूपवते
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमानंद रूपवते यांना शिवसेनेत आणून शिर्डीतून उभे करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वतरुळात होती. मात्र, स्वत: रूपवते यांनीच दोन दिवसांनी या चर्चेचे खंडन केले आहे. आपण कोणत्याही स्थितीत काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.