आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही यंत्रणा उभारून महामानवाला नमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोत विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मित्रमंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यामध्ये खुटवडनगर येथे खुटवडनगर मित्रमंडळाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात अाली असून, या यंत्रणेचे उद‌्घाटन करण्यात अाले.
खुटवडनगर मित्रमंडळातर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पोस्टर अथवा अन्यत्र निरर्थक खर्चाला फाटा देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. खुटवडनगरातील मुख्य चौकात मंडळाचे अध्यक्ष भूषण कदम यांच्या संकल्पनेतून ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेचे उद‌घाटन अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गणेश अरिंगळे, अंकुश वराडे, मुकेश शहाणे, नीलेश जोशी, सुधाकर जाधव, स्वप्नील नेटावटे, बाळा शेळके, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक बर्डेकर यांनी खुटवडनगर मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

दृष्टीयुवा फाउंडेशनच्या वतीने अनाथाश्रमात वस्तू वाटप : राणेनगरयेथील दृष्टी युवा फाउंडेशनच्या वतीने त्र्यंबकरोडवरील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या अनाथाश्रमात जाऊन डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या आश्रमातील मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विनीत झाल्टे यांनी ही संकल्पना मांडली होती.

याप्रसंगी हर्षल पवार, इनायत शहा, नीलेश मोरे, सुरेंद्र निले, स्वप्नील ठाकरे, सुधीर महाले, विशाल रोकडे, केदार कुलकर्णी, विशाल तिरसा, राहुल एखंडे, मिथुन घुद्रे, शुभम महाजन, हेमंत महाजन, लोकेश सावरकर आदी उपस्थित होते.

दाेन चाैकांत यंत्रणा तैनात
खुटवडनगर येथील मुख्य चौकात दोन सीसीटीव्ही बसविण्यात आले. यासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च आला असून, काही खर्च हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: केला अाहे. ही सीसीटीव्ही यंत्रणा उच्च दर्जाची असून, रात्रीच्या वेळीसुद्धा चित्रीकरण सुस्पष्ट होण्यास यामुळे मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...