आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक: स्त्रीभ्रूणहत्या आणि स्त्रियांच्या पुरुषांपेक्षा घटत्या प्रमाणाविषयी राज्यासह देशात सर्वच स्तरावरून चिंता व्यक्त होत असताना नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दर हजारी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या प्रमाणात असलेली तफावत 54 ने कमी झाली आहे.
बीडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गर्भलिंगनिदान करून स्त्रीभ्रूणांची हत्या करण्याचे प्रकार अलिकडे उघडकीस आले आहेत. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणार्या डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळला आहे. त्यापाठोपाठ महापालिकेच्या आरोग्य विभागानेही शहरातील गर्भलिंगनिदान करणार्या डॉक्टरांवर लक्ष केंद्रित केले आहे.
एकीकडे आरोग्य विभाग कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र या कारवाईचा धाक म्हणा, किंवा जनजागृतीचा परिणाम, स्त्रियांचे पुरुषांच्या तुलनेत दरहजारी प्रमाण पूर्वीपेक्षा बर्याचअंशी वाढतच चालल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जानेवारीत एक हजार पुरुषांमागे 847 स्त्रिया होत्या. म्हणजेच 153 ने स्त्रियांचे प्रमाण पुरुषांमागे कमी आहे. मार्चमध्ये मात्र स्त्रियांचे प्रमाण 901 इतके झाले. म्हणजे, तफावत कमी होऊन प्रमाण 99 वर आले. सुमारे तीन महिन्यांत ही तफावत तब्बल 54 ने घटली आहे. मागील वर्षाचा दरहजारी प्रमाणातील कमाल फरकाचा विचार केला तर, मे महिन्यात पुरुषांमागे महिलांची संख्या तब्बल 214 ने कमी होती. गेल्या वर्षीच सप्टेंबरमध्ये ही तफावत तुलनेने सर्वात कमी (दरहजारी 124 ने कमी) होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.