आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या अाश्रमशाळांमध्ये स्वच्छता व सुरक्षा धाब्यावर; ना अधीक्षक, ना पहारेकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरील त्र्यंबक तालुक्यातील देवडोंगरा शासकीय आश्रमशाळा. पाड्यावरच्या एका भाड्याच्या कौलारू घराच्या ओट्यावरच मांडलेली मुख्याध्यापकांची टेबल-खुर्ची, समोर जनावरांचा गोठा आणि मागील भिंतीवर ‘आदिवासी जनहिताय’ची उद्घोषणा करणारी आदिवासी विकास खात्याची पाटी. घराच्या ओसरीतून मुलांच्या बाराखडी पाठांतराचे सूर आणि गोठ्यातील जनावरांच्या हंबरण्याचे सूर एक झालेले. त्याही परिस्थितीत सर्व काही अलबेल दाखवण्यासाठी मुख्याध्यापकांची सारवासारव. शेणाने सारवलेल्या जमिनीवर सुरू असलेला आदिवासी विद्यार्थ्यांचा अभ्यास. इथल्या पाड्यावरच्या भाड्याच्या सहा खोल्या हेच या शासकीय आश्रमशाळेचे वर्ग आणि हेच या विद्यार्थ्यांचे वसतिगृह. त्यामुळे स्वच्छ आणि सुरक्षित स्नानगृह आणि स्वच्छतागृह दूरच. हिरव्या ताडपत्री गुंडाळून उभारलेल्या तकलादू बाथरूम म्हणजे या शाळेतल्या शंभर विद्यार्थ्यांचे स्नानगृह आणि दोन खड्डे खोदून उभारलेली चौकट म्हणजे शौचालय. त्यामुळे अंघोळीस झरा आणि इतर विधीसाठी उघड्यावर, याशिवाय येथील मुलांना पर्याय नाही.
देवडोंगरा शासकीय आश्रमशाळेची स्थिती (ता. त्र्यंबक, जि. नाशिक)
सुरक्षा व्यवस्था
{ना अधीक्षिका, ना पहारेकरी

{मुलींसोबत राहतात स्वयंपाकी बाई

{टोल फ्री नंबर नाही

स्वच्छता व्यवस्था
{जाळीच्या ताडपत्रीची स्नानगृहे
{मुले झऱ्यावर करतात अंघोळी
{शौचालयाचे दोन खड्डे नावासाठी
{मुले-मुलींची उघड्यावरच ‘स्वच्छता’
निवास व्यवस्था
{गेल्या 12 वर्षांपासून जागा नाही
{दिवसा त्याच वर्गखोल्या आणि रात्री तिथेच मुक्काम
{मुख्याध्यापकांचे कार्यालय ओट्यावर
{दारात जनावरांचा गोठा

पुढील स्‍लाइडवर वाचा धुळे जिल्‍हयातील आश्रमशाळांची स्थिती

बातम्या आणखी आहेत...