आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब नोटा आता सर्वच बँकांत बदलून मिळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चलनातील नोटा स्वच्छ व चांगल्या अवस्थेत नागरिकांना मिळाव्यात, यासाठी रिझर्व्ह बॅँकेने सर्वच बॅँकांना निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक बँकेने फाटक्या नोटा बदलून देण्याची सुविधा सुरू करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने यापूर्वीच दिले आहेत. मात्र, अशा नोटा बदलण्याकरिता अनेक बॅँकांकडून स्टेट बॅँकेकडे बोट दर्शविले जाते. सर्वसाधारण नियमानुसार बॅँकेच्या व्यवहारात आलेल्या फाटक्या नोटा ग्राहकांना न देता त्या स्वत:कडे ठेवून रिझर्व्ह बॅँकेकडे जमा करण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅँकेने यापूर्वीच दिलेले आहेत.
खाडाखोड केलेल्या, फाटलेल्या किंवा मळक्या नोटा चलनातून बाद व्हाव्यात याकरिता रिझर्व्ह बॅँकेच्या ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत ही सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. चांगल्या नोटांतून खराब नोटा वेगळ्या करता याव्यात याकरिता बँकांमध्ये सॉर्टिंग मशीन बसविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चार लाख रुपयांपासून पुढे किंमत सुरू होणार्‍या या मशीनद्वारे ‘एटीएम’करिताच्या नोटा, बनावटसदृश नोटा व फाटक्या नोटा वेगवेगळ्या काढल्या जातात. यात किती फाटक्या नोटा बॅँकांत जमा झाल्या याची नोंद ठेवून त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठवायचा असतो.
स्थितीनुसार मिळतो परतावा
नोटांची स्थिती पाहून रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या निर्देशांनुसार या नोटांचा परतावा ग्राहकांना मिळतो. नोटेचा किती भाग खराब झाला आहे, यावर तिचे मूल्यांकन केले जाते. नोटा बदलून देण्याची अशा प्रकारची सुविधा आपल्या बॅँकांच्या शाखांत उपलब्ध असल्याचे एसएमएस अनेक बॅँका ग्राहकांना पाठवित आहेत.
बँकांनी पुन्हा चलनात आणू नये
फाटक्या नोटा चलनातून बाद व्हाव्यात याकरिता रिझर्व्ह बॅँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ केव्हाच लागू केलेली आहे. त्यानुसार आता बॅँकांनी मळलेल्या, फाटक्या, लिहिलेल्या नोटा जमा करून घ्याव्यात. मात्र, त्या पुन्हा चलनात आणू नयेत असे आदेश आहेत. बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बँक
सहकारी बँकांचाही पुढाकार
फाटक्या नोटा बँकांनी स्वत:कडे जमा करून घेऊन त्यांची नोंद ठेवणे, या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडे जमा करणे, हा नियम पूर्वीचाच आहे. सहकारी ही तो पाळतात; पण नागरिकांमध्येही नोटांवर लिहू नये याकरिता जागृती होणे गरजेचे आहे. विश्वास ठाकू र, संचालक, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बॅँक्स असोसिएशन