आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाणीत विक्रीला बसायचं का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सराफ बाजारातील फूलविक्रेत्यांनीही नवीन बाजाराकडे पाठ फिरवली. शुक्रवारी सकाळपासून एकही फूलविक्रेत्याने बाजारात दुकान लावले नसल्याने भाजीविक्रेत्यांप्रमाणे त्यांनीही नवीन बाजाराकडे पाठच फिरवल्याचे समोर आले. घाणीत व्यवसाय करायचा का, असा सवाल काहींनी केला.

सराफ बाजाराच्या कोपर्‍यावरील फूलबाजाराचे स्थलांतर शुक्रवारी होणार होते. मात्र विक्रेते जुन्याच जागेवर बसले. परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न चर्चेत येत असल्याने फूलविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र सुमारे चारशे वर्षाचा फूलबाजाराला पार्यायी जागा नसल्याने कारवाई होत नव्हती. प्रशासनाने नवीन बाजारात जागा देण्याची तयारी दर्शवली होती.