आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badminton Player Pradnya Will Marry With Pranav Chopra

बॅडमिंटनपटू प्रज्ञाचा‘प्रणव’विवाह, महाराष्ट्राची कन्या होणार लुधियानाची सून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रज्ञा आणि इन्सेट छायाचित्रात प्रवण चोप्रा. - Divya Marathi
प्रज्ञा आणि इन्सेट छायाचित्रात प्रवण चोप्रा.
नाशिक - नाशिकची फूलराणी बॅडमिंटनक्वीन प्रज्ञा गद्रे हिने तिचा मित्र अाणि अांतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रणव चाेप्रा याच्याशी विवाह करणार असल्याचे जाहीर केले अाहे. लुधियाना (पंजाब) येथील प्रणवच्या घरी नुकताच वाङ्निश्चय झाला असून, दिवाळीनंतर ते नाशकात विवाहबद्ध हाेणार अाहेत.

मूळ नागपूरची मात्र बालपणीच नाशिकला अाल्याने नाशिककर झालेली प्रज्ञा गद्रेचे नाव गत सहा वर्षांपासून राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय स्तरावर गाजत अाहे. ती दुहेरीमधील भारताच्या टाॅपच्या दाेन जाेड्यांपैकी एकीत खेळत असून, अनेक राष्ट्रीय विजेतेपदे मिळवली अाहेत. वर्षभरापासून टेनीस एल्बाेच्या दुखण्यामुळे वर्षभर बॅडमिंटनपासून दूर हाेती. मात्र हैदराबादमध्ये शस्त्रक्रिया झाली असून लवकरच ती पुन्हा सराव सुरू करणार अाहे.

पुढे वाचा...
> नवीन स्टार प्रणव लुधियानाचा अाहे. ताेही दुहेरीतील भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू असून, महाराष्ट्राचाच अक्षय देवळालकर त्याचा डबल्सचा पार्टनर अाहे.
>मिश्र दुहेरी एकत्र यश
>दाेघेही ज्युनिअरच्या गटात खेळत असल्यापासून एकमेकांना अाेळखत हाेताे. मात्र, २००९ साली प्रथमच मिक्स डबल्स खेळलाे, तेव्हा एकमेकांचा स्वभाव समजला