आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bal Bharati Books To Distribute 15 Days At Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंधरवड्यात मिळणार बालभारतीची पुस्तके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: शाळा उघडण्यासाठी अवघा पंधरा दिवसांचा कालावधी विद्यार्थी अन् पालकांच्या हाती राहिलेला असताना बालभारतीची पुस्तके अद्याप बाजारपेठेत आलेली नाहीत. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची संभाव्य पंचाईत लक्षात घेता 15 दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बालभारतीचे नाशिक विभागीय कार्यालयातील भांडार व्यवस्थापक ए. बी. यादव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
यंदा इयत्ता नववी आणि अकरावीचे अभ्यासक्रम बदलल्याने या पुस्तकांच्या छपाईत उशीर होत आहे. शिक्षण मंडळाने नवे अभ्यासक्रम बालभारतीकडे दिले असून, मान्यता मिळालेल्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू असल्याची माहितीही यादव यांनी यावेळी दिली.
नववीची प्रथम, व्दितीय आणि तृतीय भाषेची पुस्तके आठवडाभराच्या कालावधीत बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत, तर अकरावीचे ‘ऑर्गनायझेशन ऑफ कॉर्मस अँण्ड मॅनेजमेंट’ हेच पुस्तक बाजारपेठेत शिल्लक आहे.