आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; महापौरांना पडला विसर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाशकात स्मारक साकारण्यासंदर्भात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेतील गटनेत्यांच्या होणार्‍या बैठकीकडे सर्वांनीच पाठ फिरविली. तर, याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या महापौरांनाही त्याचा विसर पडल्याने स्मारकाचा निर्णय लांबणीवर पडू लागला आहे.

नाशकात शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी महासभेत विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, गटनेता अजय बोरस्ते यांच्यासह शिवसैनिकांनी केली होती. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत ठराव मंजूर केला. महापौरांनी गटनेत्यांची समिती स्थापून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचेही जाहीर केले होते. किमान 23 जानेवारी म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येस तरी यासंदर्भात घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, या बैठकीची आठवण कोणालाच राहिलेली नाही.

स्पष्टीकरण द्यावे
सर्व गटनेत्यांची बैठक घेण्याविषयी महापौरांनी सांगितले होते. मात्र, बैठक का बोलविली नाही, याबाबत महापौरांनीच स्पष्टीकरण द्यावे. अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

अभियंत्यांना आदेश
स्मारकासाठी कोणती जागा उपलब्ध होऊ शकते याविषयी माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले आहे. अँड. यतिन वाघ, महापौर