आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांची सही अन‌् रेखाटलेले व्यंगचित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शनिवारी (दि. २३) ८९वा जन्मदिन. पूर्वी ठाकरे कुटुंबीयांपैकी नाशिकला काेणीही अाले की, अाप्पा टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट ठरलेली असे. मग प्रबाेधनकार ठाकरे असाे, बाळासाहेब ठाकरे असाे वा मीनाताई ठाकरे असाे. पाहुणचार, गप्पागाेष्टी हाेत असे. त्याचवेळी अाप्पांनी बाळासाहेबांची अापल्याकडील बर्थ डे बुकमध्ये सही घेऊन ठेवली हाेती, तर गाेवा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने १९ डिसेंबर या पानावर एक मार्मिक असे व्यंगचित्र रेखाटून त्या घटनेवर अापले भाष्य केले हाेते. या बर्थ डे बुक बद्दल त्यावेळी त्यांनी भरभरून काैतुक केले हाेतं.

अाप्पांच्या या ‘बर्थ डे बुक’ची जन्मकथा निराळीच. अामची अाजी रुथाबाई ऊर्फ मनाेरमा ही १३ नाेव्हेंबर १९१४ राेजी गेली. त्यानंतर अाप्पांनी एक अमेरिकन मिशनऱ्याकडे अशी वही बघितली. त्यात अाॅक्टाेबर महात्म गांधी यांच्या सहीखाली माझ्या अाजीची म्हणजेच अाप्पांच्या अाईची सही हाेती. अशी वही पाहून अाप्पांना माेठी गंमत वाटली. पुढे त्यांनीही हा छंद जाेपासायला सुरुवात केली. घरी काेणीही नवीन व्यक्ती अाली की, अाप्पा त्या वहीत त्या तारखेवर त्या व्यक्तीची सही अाणि नाव लिहून घेत असत. अशा सात ते अाठ हजार सह्यांची एक माेठी वहीच त्यांनी तयार केली हाेती. सुरुवातील एका तारखेसाठी एक पान त्यांनी तयार केले. पण एक पान काही पुरेना. मग एका तारखेसाठी तीन पाने असे ठरले. अशी जवळ-जवळ ११०० पानांची वही त्यांनी तयार करून ठेवलेली अाहे. अनेक मान्यवरांच्या त्यात सह्या अाहेत. नावे अाहेत. अाप्पांच्या या ठेव्याला अाज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

पुढे पाहा... जानेवारी महिन्यात जन्म असलेल्या या मान्यवरांच्या सह्या
साैजन्य- मुक्ता टिळक