आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यंदा शिवसेनेने शहरातील घराेघरी वा साेसायट्यांमध्ये जाऊन पाणीबचतीबराेबरच गळतीवर दुरुस्तीचा उपाय याेजण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात शिवसेनेची प्लंबर समिती जाऊन सार्वजनिक वा घरांतील नळांची, जलवाहिनीची माेफत दुरुस्ती करणार अाहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविला जात असून, याबराेबरच दाेन अागळेवेगळे उपक्रमही राबविले जाणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी दिली.
शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीपासून शिवसेना शहरात नानाविध उपक्रम राबविणार अाहे. त्यात प्रामुख्याने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निव्वळ प्रबाेधन करण्यापेक्षा तळापर्यंत जाऊन उपाय याेजण्याचे प्रयत्न अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या सहाही प्रभागांत सहा पथके जाऊन पाणीगळती शाेधून काढणार अाहेत. साेसायटीतील सामायिक नळ, स्टॅण्ड पाेस्ट, जलवाहिन्यांची गळती शाेधून दुरुस्ती केली जाणार अाहे. काेणाच्या घरी जरी पाण्याची गळती हाेत असेल तर शिवसेना माेफत दुरुस्ती करून देणार अाहे. पाण्याविषयी टीका करण्यापेक्षा प्रबाेधनाच्या माध्यमातून बचतीचा जागर केला जाणार अाहे. याबराेबरच महापुरुषांच्या शहरभरातील पुतळ्यांची स्वच्छता साफसफाई केली जाणार अाहे.

अाता पाेलिसांवर शिवसेनेचा वचक : गेल्याकाही दिवसांपासून शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून, पाेलिसांचा वचक नसल्याची टीका हाेत असल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. विशेषत: महिलांसंदर्भातील साेनसाखळी चाेरी वा अन्य गुन्हे वाढले असून, तक्रार देताना गहाळ झाल्याची नाेंद पाेलिस करीत अाहेत. या पार्श्वभूमीवर अशा तक्रारी व्यवस्थित दाखल करून त्याचा पाठपुरावा शिवसेना करणार अाहे. शिवसेना संपर्क कार्यालयात एका क्रमांक दिला जाणार असून, हेल्पलाइन सुरू केली जाईल. येथे तक्रार केल्यानंतर संबंधित पाेलिस ठाण्याशी शिवसेनेचे पदाधिकारी पाठपुरावा करून चाेरीला गेलेले साहित्य परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बाेरस्ते यांनी सांगितले.

महापालिकेची परवानगी घेऊन लावणार हाेर्डिंग
शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात प्रतिमापूजन हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या प्रतिमेचे हाेर्डिंग लावण्यासाठी एक दिवसाची परवानगी द्यावी, अशी मागणी बाेरस्ते यांनी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली. हाेर्डिंग त्या खाली असणाऱ्या स्टॅण्डसाठी एकासाठी २५० रुपये इतके शुल्कही महापालिकेला भरण्याची तयारी दाखविली. त्यावर अायुक्तांनी परवानगी दिल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले.

सावरकरांसाठी एक लाख पाेस्टकार्ड पाठविणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्यवीर विनायक दामाेधर सावरकर यांच्या विचारांत साम्य हाेते. किंबहुना, बाळासाहेबांवर सावरकरांच्या विचारांचा माेठा प्रभाव हाेता. त्याबराेबरच नाशिक हे सावरकरांचे जन्मस्थान असून, त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली हाेती. या पार्श्वभूमीवर युवा विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते महाविद्यालय महत्त्वाच्या चाैकांत जाऊन लाेकांकडून एक लाख पाेस्टकार्ड भरून घेणार अाहेत. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना दिले जाणार अाहे.