आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार नाही : बालभारती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांर्गत 2014-15 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी, चौथीसह पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार होता. मात्र, यंदा पाचवी यंदा पाचवीचा अभ्यासक्रम या वर्षी बदणार नसल्याची माहिती बालभारतीकडून देण्यात आली आहे.

तिसरी ते पाचवी अशा तिन्ही इयत्तांच्या पुस्तकांची निर्मिती एकाच वर्षी करणे शक्य नसल्यामुळे पाचवीच्या अभ्यासक्रम पुढच्या वर्षी बदलण्याची सूचना बालभारतीकडून शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. शिक्षणाबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे, तर प्राथमिक शाळांमधील मुलांना पाठांतरापेक्षा सहज आकलन होईल, या उद्देशाने मागील वर्षापासून बालभारतीतर्फे अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क नियमान्वये 2013 पासून इयत्ता पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम बदलायला हवा, असा शासनाचा अध्यादेश आहे.