आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या झालेल्या कुख्यात \'बाल्या\'ची पोलिस-महापौरांसोबत होती उठबैस, FB मुळे सत्य आले समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहीहंडी उत्सवाचा नारळ वाढवताना बाल्या माेरे. समवेत पाेलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख. - Divya Marathi
दहीहंडी उत्सवाचा नारळ वाढवताना बाल्या माेरे. समवेत पाेलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख.
नाशिक- गुरुवारी(दि. १७) रात्री निर्घृण हत्या झालेला सराईत गुन्हेगार निखिल मनाेहर माेरे ऊर्फ बाल्या याची महापाैर रंजना भानसी यांच्यापासून तर म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यापर्यंत सर्वांमध्येच उठबैस असल्याचे धक्कादायक वास्तव फेसबुकवरील छायाचित्रांमुळे समाेर अाले अाहे. वस्तुत:, एखादी व्यक्ती सामाजिक शांततेचा भंग करीत असेल, किंबहुना समाजाला धाेका पाेहाेचेल अशी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर त्याच्याबराेबर सहजासहजी काेणी संबंध ठेवत नाही. किमान, समाजाचे भले करण्याची अन‌् सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या राजकीय वा सरकारी मूखंडांनी तरी अशा व्यक्तीपासून चार हात लांब राहण्याचे भान बाळगणे अपेक्षित असताना ते त्यांच्याकडून सुटल्याने अाश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे. 

पाेलिस निरीक्षकांनी १५ अाॅगस्टच्या दिवशी दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अायाेजकाच्या भूमिकेतील बाल्याबराेबर फाेटाेसेशनही केले हाेते. अशा पद्धतीने गुन्हेगारांवरच रक्षणकर्ते मेहेरबान हाेणार असतील तर समाजाने सुरक्षेसाठी काेणाकडे बघावे? असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. गेल्या काही दिवसांत नाशिकमधील टाेळीयुद्ध टाेकाला गेले असून, एकापाठाेपाठ एक गुन्हेगारी टाेळ्यांच्या म्हाेरक्यांचे खूनसत्र सुरू अाहे. मुख्य म्हणजे, अनेक टाेळ्यांना राजकीय पाठबळ असल्याचे समाेर अाले असून, पुढारीच नाही तर काही पाेलिस अधिकारीही गुन्हेगारांच्या खास वर्तुळात असल्याचे मध्यंतरी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाइकाच्या लग्नातील सहभागावरून उघड झाले हाेते. गुन्हेगार, पुढारी पाेलिस यांच्यातील अभद्र युतीबाबत वारंवार चर्चा घडूनही या संबंधांत यत्किंचितही दुरावा निर्माण झाला नसल्याची बाब बाल्याच्या हत्येनंतर उघड झाली अाहे. बाल्याचा खून झाल्यानंतर त्याच्यावरील दाेन खुनाच्या अाराेपांसह असलेल्या गुन्ह्यांची जंत्रीच पाेलिसांकडून वाचली गेली. नगरसेवक खुनाच्या अाराेपावरून तुरुंगात असलेल्या अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचा बाल्या शहराध्यक्षही हाेता. 

बाल्याचा एक भाऊबंद शहरातील माेठ्या गुन्हेगारी टाेळक्याचा म्हाेरक्याही अाहे. इतकी वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही बाल्या पाेलिसांपासून तर राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाचा फेव्हरिट असल्याचे फेसबुकवरील छायाचित्रांवरून दिसते. बाल्यावर गुन्हे असले तरी, सामाजिक उपक्रमांसाठी साईबाबा फाउंडेशनमध्ये ताे सक्रिय हाेता. या फाउंडेशनचे फेसबुकवर खाते असून त्यात बाल्याच्या प्रत्येक उपक्रमात काेण काेण कशी हजेरी लावायचे हे स्पष्ट दिसते. केवळ सामाजिक कार्यक्रम नाही तर त्याच्या सहकाऱ्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यापर्यंत ‘व्हीअायपीं’ची उघडपणे उठबैस हाेती. 
 
खुनापूर्वी चार दिवस अाधीच दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी वरिष्ठ निरीक्षक हे प्रमुख अतिथी असल्याचे समाेर अाले अाहे. त्यांच्या हस्ते ढाेलवादनाने कार्यक्रमाचे उद‌्घाटनही झाले. साईबाबा मंदिरात बाल्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत केलेले फाेटाेसेशनही चर्चेत अाहे. एकवेळ गुन्ह्यांची माहिती नाही असे सांगून पुढारी हात झटकतील, मात्र गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवून असलेले पाेलिस जेव्हा डाेळे बंद करून त्यांच्या उपक्रमात खांद्याला खांदा लावून सहभागी हाेत असतील तेव्हा मात्र समाजाने सुरक्षेसाठी काेणाकडे बघितले पाहिजे? असाही प्रश्न अाता उपस्थित हाेत अाहे. 

अाता पाेलिस अायुक्त काेणावर कारवाई करणार? 
काहीदिवसांपूर्वी पंचवटीत कुख्यात किरण निकम याचा खून झाल्यानंतर मारेकऱ्याच्या फेसबुक अकाउंटवरील समर्थकांना पाेलिसांनी फैलावर घेतले हाेते. नुसते ‘लाइक’ केले म्हणून त्यांना पाेलिस ठाण्यात चाैकशीसाठी बाेलावले गेले हाेते. यात भाजपचा एक नगरसेवक मनसे नगरसेविकेच्या पतीचा समावेश हाेता. अाता बाल्या खून प्रकरणानंतर फेसबुकवर खुद्द म्हसरूळच्या वरिष्ठ निरीक्षकांचेच छायाचित्र झळकत असल्यामुळे या प्रकरणात पाेलिस अायुक्त काेणावर कशी कारवाई करणार, असा प्रश्न अाहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा बाल्याचे अधिकाऱ्यांसोबतचे संबंधित फोटोज्....
 
संबंधित वृत्त...
बातम्या आणखी आहेत...