आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही ‘नो डीजे’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंचवटी परिसरातील नवरात्रोत्सवामध्ये यंदा डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांवर दांडिया खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचवटी पोलिस ठाणे येथे झालेल्या बैठकीत मंडळांनी सहभाग घेत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंचवटी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराने गणेशोत्सवात मंडळांनी डीजे लावला नाही. पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत मंडळांनी पोलिसांना सहकार्य केले. नवरात्रोत्सवही याच प्रकारे साजरा करण्याकरिता पंचवटी पोलिस ठाण्यात मंडळांची आणि शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये ध्वनिप्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचे शिबिर घेण्यात आले. बैठकीस सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र पिंगळे, यांच्यासह शांतता समितीचे सदस्य सभापती लता टिळे, नगरसवेक अशोक मुर्तडक, राहुल ढिकले, डॉ. विशाल घोलप, रूची कुंभारकर, गणेश चव्हाण, प्रा. परशराम वाघेरे, सुनील केदार, पद्माकर पाटील, प्राचार्य हरीश आडके यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

सर्व मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा

गणेशोत्सवात मंडळांनी डीजे न लावता सहकार्य केले. नवरात्रोत्सवातही मंडळे सहकार्य करतील. नागरिकांच्या सहकार्यामुळे उत्सवामध्ये अनुचित प्रकार घडत नाहीत. मंडळांनी आणि पोलिसांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. बाजीराव भोसले, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी