आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंगा संजोग’तर्फे दुर्गा पूजा; पारंपरिक बंगाली पद्धतीची आरास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात नवरात्रोत्सवाची रंगत वाढत असतानाच सोमवारी १९ ऑक्टोबरपासून शहरवासीयांना दुर्गा पूजा महोत्सवाची पर्वणी लाभणार आहे. बंगा संजोग फाउंडेशनतर्फे षष्ठीपासून या महोत्सवाची शहरात सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, ज्यामध्ये पारंपरिक बंगाली पद्धतीची आरास, पूजा आणि उत्सवाचा समावेश असेल.
या महोत्सवाचे नाशिकमध्ये हे तिसरे वर्ष असून, यंदा १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नंदनवन लॉन्स येथील अन्नपूर्णा हॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १९ ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता षष्ठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता आमंत्रण आणि ओढीबास हा कार्यक्रम होणार आहे.
याच दिवशी सायंकाळी वाजता औपचारिक उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील. त्यानंतर २०, २१ २२ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमीचे पूजन होणार असून, याही दिवसांना विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याची सांगता सर्वांचे आकर्षण ठरणाऱ्या सिंदूर उत्सवाने २३ ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता होणार आहे.

या कार्यक्रमांबरोबरच २६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमादेखील साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यांसाठी आणि कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांना उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण मुखर्जी, उपाध्यक्ष बरुण पॉल आदींनी केले आहे.