आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूच्या अपहृत मुलाने जळगाव रेल्वेस्थानकावर करून घेतली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : जळगाव स्थानकावर एक एक्स्प्रेस थांबल्यावर एक १३ वर्षांचा मुलगा गाडीतून उतरला अाणि भेदरलेल्या अवस्थेत पळत सुटला. त्याला पाहिल्यानंतर अारपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्याची चाैकशी केली. मात्र, त्याला मराठी किंवा हिंदी भाषा येत नसल्याने त्याने ताेडक्यामाेडक्या मातृभाषेत अापले अपहरण झाल्याचे सांगितले. 
 
त्यानंतर सर्व यंत्रणा लगेच कामाला लागली त्याच्या अाई-वडिलांना शाेधून काढले. तुमचा मुलगा सुखरूप अाहे, असे सांगितल्यानंतर अारपीएफ मुलाच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. हा संपूर्ण घटनाक्रम शुक्रवारी दुपारी जळगाव रेल्वेस्थानकावर पाहायला मिळाला. 
 
जळगाव रेल्वेस्थानकावर शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अारपीएफचे पाेलिस उपनिरीक्षक के. बी. सिंग, कुलदीप सिंग, भूषण पाटील ए. एस. गव्हाणे हे गस्त घालत हाेते. त्याच वेळी कर्नाटक एक्स्प्रेस फलाटावर अाली. याच गाडीतून उतरल्यानंतर एक १३ वर्षांचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत त्यांना सैरावैरा पळताना दिसला. या दाेघा अधिकाऱ्यांनी त्या मुलाला थांबवून त्याची चाैकशी केली. मात्र, त्याला पाेलिस अधिकाऱ्यांची भाषा कळत नव्हती.
 
भाषेमुळे अडचणी 
सापडलेल्या मुलाला पाेलिसांची भाषा कळत नव्हती. त्याला प्रश्न विचारल्यानंतर ताे कानडी भाषेत बाेलत हाेता. पाेलिस निरीक्षक साेनाेनी यांना कानडी भाषा थाेडी फार समजत हाेती. त्यामुळे ताेडक्यामाेडक्या कानडी भाषेत बाेलून त्याच्याशी सुरुवातीला साेनुनी यांनी संवाद साधला. 
 
विमानाने आले मुंबईत 
श्रवण मिळाल्याचे समजल्यानंतर त्याच्या अाई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी विमानाने मुंबई गाठले. शनिवारी सकाळी वाजेच्या सुमारास दादर-गुवाहटी एक्स्प्रेसने दुपारी वाजेच्या सुमारास ते जळगावात दाखल झाले. 
 
बंगळुरूत अपहरणाचा गुन्हा दाखल 
रेल्वे पाेलिसांनी श्रवणची चाैकशी केल्यानंतर त्याची काही प्रमाणात माहिती मिळाली. त्यावरून साेनुनी यांनी इंटरनेटवरून फाेन क्रमांक मिळवले. त्यानंतर बंगळुरू येथील नियंत्रण कक्षात फाेन लावून श्रवणविषयी तपास केला. या वेळी के. पी. अागरारा पाेलिस ठाण्यात गुरुवारी श्रवणच्या वडिलांनी अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली असल्याचे समजले, तर साेनुनी बाेलत असतानाच श्रवणचे अाई-वडील पाेलिस ठाण्यात श्रवणच्या चाैकशीसाठी बसलेले हाेते. त्यांच्याशी बाेलणे झाल्यानंतर पाेलिसांची खात्री पटली. 
 
४९ तासांनंतर आईने श्रवणला कवटाळले 
बंगळुरू येथून जानेवारी राेजी सायंकाळी वाजता अपहरण झालेल्या श्रवणची अाई पुष्पा अनंतकुमार चिद्रूप, त्यांचे भाऊ सुरेश बद्रीअप्पा अाणि पुनीत कुमार यांच्यासह शनिवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर पाेहाेचले. तर अारपीएफ ठाणे गाठून दाेन दिवसांपासून दुरावलेल्या मुलाला अाईचे अासुसलेले डाेळे शाेधत हाेते. मुलगा नजरेस पडल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 
 
दाेन दिवसांपासून दुरावलेला श्रवण शनिवारी सायंकाळी वाजता अाईच्या कुशीत गेल्यानंतर काही मिनिटे रडत हाेता. त्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार अाईला सांगितला. अारपीएफने सर्व कार्यवाही करून श्रवणला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता ते श्रवणला घेऊन कामायनी एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना झाले. तेथून ते रविवारी विमानाने बंगळुरू येथे जाणार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...