जवळपास सर्वच प्रमुख राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँका ग्राहकांना देत असलेल्या विविध सेवांपोटी शुल्क वाढविण्याच्या तयारीत आहेत. अँक्सिस बॅँक, युनियन बॅँकेपाठोपाठ स्टेट बॅँक ऑफ इंडियानेही शुल्कवाढीची घोषणा केली असून, अन्य बॅँकाही याप्रकारचे शुल्क वाढविणार असल्याची शक्यता बॅँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
बँका एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करणार नसल्या तरी, इतर सेवांचे शुल्क मात्र वाढवित आहेत. बँकेकडून आता डुप्लिकेट पिन घ्यायचा असो की, डिमांड ड्राफ्ट बनवायचा असो. त्यासाठी अधिक पैसे मात्र मोजावे लागणार आहेत. बँकांद्वारे मिळणार्या एसएमएस अलर्ट सेवेकरिताही आता अधिक शुल्क मोजावे लागेल. अँक्सिस बॅँक, सिटी युनियन बॅँक आणि स्टेट बँकेने याच प्रकारच्या काही घोषणा केल्या आहेत.
स्टेट बॅँक आणि युनियन बॅँकेने नुकतेच सेवाशुल्क वाढविले असून, एटीएम व्यवहार शुल्काबाबत मात्र कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याकरिता पंधरा दिवसांत बँकांकडून प्रस्ताव मागविला असून, त्यानंतर याबाबत दिशा स्पष्ट होणार आहे.
अँक्सिस बॅँक
-इसीएस डेबिट अयशस्वी झाले तर आता 350 रुपये भरावे लागतील. यासाठीचे शुल्क पूर्वी 200 रुपये होते.
- बॅँकेतून डुप्लिकेट पिन घ्यायचा असेल तर 100 रुपये मोजावे लागणार आहेत.
- डिमांड ड्राफ्ट जर तुम्ही कॅन्सल करीत असाल तर आता 100 रुपये मोजावे लागतील.
-तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर प्रत्येक महिन्याला 250 रुपये मोजावे लागतील.
सेवांसाठी भुर्दंड
अँक्सिस, युनियन बँकेपाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडियानेही केली शुल्कवाढीची घोषणा, लो बॅलन्स किंवा चेक परत जाणे पडणार महागा