आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉकेटमनी अन् वेतन एका कार्डद्वारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-दुसर्‍या शहरात शिक्षण घेणार्‍या मुलांना पॉकेटमनी पाठवणे असो किंवा घरातील नोकर वा फॅक्टरीतील कर्मचार्‍यांचा पगार करायचा असो, या कामासाठी वारंवार बॅँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज यापुढे भासणार नाही. कारण हे काम आता तुमच्या बॅँक खात्यातून केवळ प्रीपेड कार्ड काढून सहज शक्य आहे. ‘स्टेट बॅँक ऑफ इंडिया’ने ‘पे-आउट कार्ड’चा पर्याय आणला असून, त्याला उद्योजक, व्यावसायिकांकडून विशेष पसंती लाभते आहे.

स्टेट बॅँकेच्या सातपूर येथील मुख्य शाखेत या प्रकारचे कार्ड उपलब्ध झाले आहे. बॅँकेच्या ग्राहकांना प्रत्येक छोट्या-मोठय़ा गरजांसाठी बॅँक खाते उघडण्याची गरज राहणार नाही. ग्राहकाला बॅँकेतील त्याच्या खात्यावर ज्यांना ‘पे-आउट कार्ड’ द्यायचे आहे, त्यांची केवळ माहिती अर्जात भरून द्यावी लागेल. त्यानंतर हे कार्ड दिले जाते. ग्राहकाला हवे तेव्हा ऑनलाइन बॅँकिंगद्वारेही हे कार्ड रिचार्ज करणे शक्य असल्याने कोणत्याही वेळी पैसे ट्रान्स्फर करता येतात.

पे-आउट कार्डधारकाला एटीएमद्वारे पैसे कोठेही काढता येतात. या सर्व प्रक्रियेत फक्त एकदाच बँकेत जाण्याची वेळ ग्राहकावर येते. उद्योजकांना त्यांच्या कामगारांना मासिक पगार करणे यामुळे अत्यंत सोपे आहे.

यांना मिळू शकते कार्ड
केवायसीच्या अटी पूर्ण करणार्‍यांना तीन कार्ड. उद्योजकांना मात्र संख्येची अशी अट नाही.
कार्डमध्ये एका वेळेला 100 ते 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम टाकता येऊ शकते.
गिफ्टकार्ड केवळ पीओएस मशीनवर स्वॅप करून वापरता येते, ‘पे आउट कार्ड’धारकाला एटीएमद्वारेही पैसे काढता येतात.

कार्डला चांगली मागणी
कॅशलेस व सुरक्षित व्यवहारांसाठी हे पुढील पाऊल असून, त्याला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेषत: उद्योजकांकडून कामगारांच्या वेतनासाठी विशेष मागणी आहे. बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बॅँक