आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या सलग सुटीचा परिणाम; इसीएस असलेल्या अनेकांना बसणार दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सलग सुट्या असूनही यंदा सर्वच बँकांची एटीएम सेवा सुरळीत आहे. मात्र, पहिल्या आठवड्यातच सलग सुट्या आल्याने बँकेत वेतन जमा होऊ शकलेले नाही आणि तारखेलाच अनेकांचे इसीएस असल्याने अनेकांना अकारण दंडाचा चुना मात्र लागणार आहे.
ऐन दसऱ्याचा मुहूर्त दिवाळीच्या पंधरा दिवस आधी जोडून आलेल्या सुटीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. सुटीमुळे बँका बंद असल्याने ग्राहकांची रोख रकमेसाठी तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शनिवारच्या अर्धा दिवस कामकाजाने ही शक्यता फोल ठरली आहे. आणि ऑक्टोबरला बँकांचे काम बंद राहिल्याने त्याचा परिणाम शनिवारी बँकांच्या कॅश काउंटरवर ग्राहकांच्या रांगा होत्या. उद्यायेणार प्रचंड ताण :बँकांच्या सलग सुट्यांमुळे किमान पाचशे कोटींचे धनादेश क्लिअरिंगकरिता मंगळवारी जमा होणार असून बँकांवर प्रचंड ताण मंगळवारी पाहायला मिळणार आहे.
संडे बँकिंगचा आधार
- संडे बँकिगची सुविधा असल्याने शहरातील चार बँकांचे कामकाज रविवारी सुरू होते. बँकेचे १३० एटीएम असून, सात कोटी रुपये त्यात रोज लोड केले जातात, त्यामुळे एटीएम बंदच्या तक्रारीही आलेल्या नाहीत. -बाबूलालबंब, क्षेत्रीयमहाव्यवस्थापक, स्टेट बँक

मुदतवाढवून द्या
इसीएससाठीपाच तारीख असते. मात्र, दोन तारखेपासूनच सलग सुट्या आल्याने पगार जमा होऊ शकलेले नाहीत, इसीएस मात्र तारखेलाच क्लिअरिंगला येणार आहे. वित्त संस्थांनी ही अडचण समजावून घेत मुदत वाढवून द्यायला हवी. -देवीदासकदम, नोकरदार