आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank News In Marathi, Two Days Bank Work Stop Issue At Nashik, Divya Marathi

सलग अडीच दिवस बँका राहणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रीयकृत तसेच खासगी व सहकारी बँका शनिवारी (दि. 29) अर्धा दिवस, रविवारी साप्ताहिक सुटी आणि सोमवारी गुढीपाडव्याची सुटी यामुळे सलग अडीच दिवस बंद राहणार आहेत. स्टेट बँकेने शासकीय कामकाज होणार्‍या बँक शाखा तीनही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी ऐन ‘मार्चएण्ड’ची लगबग आणि मुहूर्तावरील खरेदीच्या काळातच या सलग सुट्या आल्याने ग्राहकांना एटीएम, क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर मोठय़ा प्रमाणावर करावा लागणार आहे.
शासकीय बिले अदा करण्याच्या दृष्टीने 31 मार्चची डेडलाइन असल्याने विशेष महत्त्व असते. अंतिम टप्प्यात मोठय़ा प्रमाणावर शासकीय कोषागारातून धनादेश अदा केले जातात. त्यामुळे या दिवशी कोषागाराशी संलग्न असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू असते. मात्र, यंदा या दिवशी आणि अगोदरच्या दिवशी सुटी आली आहे. याचा विपरीत परिणाम शासकीय आर्थिक कामकाजावर होऊ नये म्हणून स्टेट बँकेने शासकीय कामकाज असलेल्या शाखा शनिवार ते सोमवारपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शाखा मात्र नियमित सुटीमुळे बंद राहणार आहेत.
विक्रीकर विभागाचे कामकाजही नियमित वेळेत राहाणार सुरू
31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2013-14 संपत आहे. 30 मार्चला रविवार आणि 31 मार्चला गुढीपाडवा असला तरी विक्रीकर भरण्यासाठी विक्रीकर विभागाचे कार्यालय नियमित वेळेत सुरू राहणार आहे. ज्यांना 31 मार्चपूर्वी करनिर्धारण पूर्ण करणे आवश्यक आहे, पण त्यांनी अद्यापही ते पूर्ण केलेले नाही, अशा व्यावसायिकांसाठी ही संधीच म्हणावी लागेल. लक्ष्यांक गाठण्याच्या दृष्टिकोनातून वसुली व विवरणपत्र कसूरदारांचा पाठपुरावा करण्यासाठी विक्रीकर कार्यालये दोन्ही दिवशी नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहणार असल्याचे अपर विक्रीकर आयुक्त सुमेरकुमार काले यांनी म्हटले आहे.
स्टेट बॅँकेच्या या शाखा राहणार सुरू
शासकीय कोषागार शाखा, देवळाली, नाशिकरोड, सिडको, सातपूर, गंगापूररोड यांसह जिल्ह्यातील तालुकास्तरीय सर्व शाखा सुरू राहतील. शनिवार, 29 मार्च रोजी रात्री 8 वाजेपर्यंत, रविवार, 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि सोमवार, 31 मार्च रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या शाखा सुरू राहणार आहेत. मुंबईनाका, इंदिरानगर, अशोकनगर आणि द्वारका या चार शाखाही शनिवार आणि रविवारी नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक बाबुलाल बंब यांनी सांगितले.