आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरी येथील आनंद एज्युकेशनच्या शाळेला कर्जामुळे सील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याशी संबंधित दरी येथील आनंद एज्युकेशन संस्थेच्या डॉ. बळीराम हिरे उच्च माध्यमिक विद्यालयाला 56 लाख रुपयांची कर्ज थकबाकी न भरल्याने नामको बॅँकेच्या वसुली पथकाने सील ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक र्मचंट्स को- ऑप. बॅँकेच्या (नामको) विशेष पथकाने पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती देताना बॅँकेचे अधिकारी ए. एल. धोंगडे यांनी सांगितले की, आनंद एज्युकेशन संस्थेच्या डॉ. बळीराम विद्यालयाला नामको बॅँकेने 1998 मध्ये 20 लाख रुपयांचे कर्ज शाळा बांधकामासाठी दिले होते. कर्ज परतफेड करण्याची मुदत सन 2003 पर्यंत होती. मात्र, शाळेने वेळेत हप्ते न भरल्यामुळे सन 2000 या वर्षातच शाळेचे कर्ज खाते हे थकबाकीदार म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर 2002 मध्ये कर्जाची रक्कम भरण्याबाबत बॅँकेने आनंद एज्युकेशन संस्थेला वसुलीसाठी रीतसर नोटीस बजावली. त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ताबा नोटीस काढण्यात आली. त्यालाही दाद न मिळाल्यामुळे अखेरीस जिल्हाधिकार्‍यांकडे सिक्युरिटायझेशन अँक्टद्वारे शाळा ताब्यात मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला. 23 डिसेंबर 2009 रोजी तहसीलदारांमार्फत बॅँकेला ताबा देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिले. मात्र, त्यानंतरही ताबा मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात बॅँकेच्या पथकाने संचालकांच्या भेटी घेऊनही दाद मिळाली नाही. अखेर सील ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याध्यापक कार्यालय व 11 वर्गखोल्यांना सील करण्यात आले. मुख्याध्यापक जी. के. गणोरे या वेळी उपस्थित होते.