आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bar Coding Strictly For Food And Medicine Industry

अन्न व औषध उद्योगांना बारकोडिंग सक्तीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उत्पादन, त्याची कंपनी, मूल्य यांची इत्थंभूत माहिती देणारे बारकोडिंग आता अन्नप्रक्रिया आणि औषधी उद्योगांना केंद्र शासनाने अत्यावश्यक केले आहे. उद्योगांना हा आदेश येत्या दोन महिन्यांत मिळणार असून, बारकोडिंग विकसित करण्यासाठी लागणार्‍या एकूण खर्चाच्या 75 टक्क्यांपर्यंत खर्च परतावा म्हणून केंद्र शासनाच्या मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून उद्योगांना मिळतो आहे.

उत्पादक आणि उत्पादन यांची ओळख करून देणे हा बारकोडचा प्रमुख उद्देश असतो. सध्या ज्यांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते अशा फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गूड्सकरिता बारकोडचा वापर प्रामुख्याने केला जात आहे. मॉलमध्ये प्रत्येक उत्पादनाकरिता बारकोडचा वापर केला जातो. कंपन्यांना विक्री व्यवस्थापनात याचा फायदा होतो. स्टॉक नियंत्रणासह जलद बिलिंग, स्टॉकची पुनर्मागणी नोंदविणे याकरिता जसा उपयोग होतो, तसाच उत्पादन कोठे ठेवले आहे, हे ओळखण्यासाठीही ते सहाय्यभूत ठरते. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांचे सुटे भागनिर्मिती, पेपर, वस्त्रोद्योग यांसारख्या उद्योगांत संपत्ती व्यवस्थापन, काम सुरू असण्याची प्रक्रिया यातील दस्तऐवजात मानवी हस्तक्षेप किंवा हस्तलिखित नोंदी करण्यास बारकोडमुळे प्रतिबंध निर्माण होतो.

केंद्रीय अनुदानाची योजना
बारकोडकरिता नोंदणी व बारकोडचा विकास याकरिता उद्योजकाला येणार्‍या खर्चापैकी 75 टक्के खर्च परतावा स्वरूपात केंद्र शासनाकडून मिळतो. येत्या दोन महिन्यांत औषधे व अन्न उद्योग यांनाही शासनाने बारकोड अत्यावश्यक केला असल्याने प्रत्येक उद्योगाने याचा फायदा घ्यायला हवा. सुभाष सराफ, सहसंचालक, एमएसएमई

जनजागृतीसाठी उपक्रम
आयमा, नाइस आणि एमएसएमइ यांच्यातर्फे आम्ही बारकोडबाबत उद्योगांत जनजागृती व्हावी, या उद्देशाने नुकताच एक कार्यक्रम घेतला. नाशिकमधील उद्योजकांत याबाबत जागरूकता दिसली. मात्र, बहुतांश उद्योजकांना उपक्रमातून अनुदानाबाबत माहिती मिळाली. नीलिमा पाटील, अध्यक्षा, सेमिनार कमिटी, आयमा

उभ्या रेषा आणि मोकळ्या जागा यांच्याद्वारे बारकोड तयार होतो, ज्याचा उपयोग आपोआप ‘डाटा कॅप्चर’साठी होतो. संगणकाला जोडलेल्या स्कॅनरद्वारे बारकोड स्कॅनिंग केल्यानंतर संगणकावर उत्पादनावरील बारकोडमध्ये असलेले उत्पादन, त्याची कंपनी, मुदत, बॅच क्रमांक यांची सविस्तर माहिती मिळते