आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजारावर केव्हाही हाताेड्याची नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर-अंबडलिंकराेडवरील वादग्रस्त भंगार बाजार हटवण्यासाठी अाता महापालिका काेणत्याही क्षणी पूर्वसूचना नाेटीस जारी करणार अाहे. पाेलिस अायुक्तांशी चर्चा करून, राज्य राखीव दलाचा बंदाेबस्त मिळवत हा बाजार हटवला जाईल, असे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवाणी अर्ज (सिव्हिल अॅप्लिकेशन) न्यायालयात दाखल करण्याची गरज नसल्यामुळे महापालिकेने जाेरदार तयारीला सुरुवात केली अाहे.

भंगार बाजार हटवण्यासाठी दिलीप दातीर यांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवली अाहे. गुन्हेगारीचे बऱ्याच अंशी मूळ असलेला भंगार बाजार हटवण्याचे अादेश न्यायालयाने दिले; मात्र एकाही अायुक्ताने हा बाजार हटवण्याची हिंमत दाखवली नाही. प्रशासकीय कारणे, कामाचा ताण अशा सबबी देत कर्तव्यदक्षतेचा डंका मिरवणाऱ्यांनी या विषयाला साेयीस्कर बगल दिली.

अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कृष्णा यांनी भंगार बाजार काढण्याकडे लक्ष केंद्रित केले. पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल यांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे महापालिकेची उमेद वाढली अाहे. दरम्यान, कायदेशीर अडचण नकाे म्हणून महापालिकेने उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल करण्याची तयारी केली हाेती. त्यानुसार मंगळवारी महापालिका उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी कायदेशीर सल्लागार अॅड. एम. एल. पाटील यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी असा अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगत केवळ पूर्वसूचना देऊन हा बाजार हटवता येईल, असे मार्गदर्शन केले. त्यानुसार अाता अायुक्तांनी भंगार बाजार पूर्वसूचना नाेटीसीद्वारे हटवण्याची तयारी केली अाहे.

विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे या काळात भंगार बाजार हटवता येणार नाही; मात्र अधिवेशन संपण्याच्या बेतात असण्याचा काळ लक्षात घेत तत्पूर्वीच नाेटीस काढून या कालावधीत बाजार हटवण्याची सूचना दिली जाणार अाहे. पाेलिस अायुक्तांशी चर्चा करून बंदाेबस्ताची मागणी केली जाईल, असे कृष्णा यांनी सांगितले.

जागाकाेठून द्यायची; भंगाराचे काय करायचे...: भंगारबाजार काढण्याबाबत महापालिकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद राहिली अाहे. कधी बाजार काढल्यानंतर भंगाराचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित करून टाेलवाटाेलवी केली जाते, तर कधी पर्यायी भंगार बाजारासाठी जागा काेठून द्यायची, अशी अडचण सांगितली जाते. काही दिवसांपूर्वी बैठकीत अधिकाऱ्यांनी अशी कारणे दाखवल्यावर अायुक्तांनी लगेच ‘भले महापालिका अावारात भंगार बाजाराचे साहित्य अाणून ठेवा; मात्र न्यायालयाच्या अादेशाचे पालन करून भंगार बाजार हटवा’, असे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते.
वकिलांच्या काेलांटउडीने अायुक्तही चक्रावले...
महापालिकेच्यावकिलांनी काही दिवसांपूर्वी भंगार बाजार काढण्यापूर्वी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला हाेता. त्यासाठी मंगळवारी बहिरम उच्च न्यायालयात गेले हाेते. अर्ज दाखल करण्यापूर्वी पुन्हा कायदेशीर सल्ला घेतला असता वकिलांनी चक्क ‘अर्ज दाखल करण्याची गरज नाही, पूर्वसूचना पुरेशी अाहे’, असे सांगितल्यामुळे अायुक्तच चक्रावून गेल्याचे बाेलले जाते.
बातम्या आणखी आहेत...