आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मुंबईतील बडाेदा बँक लुटीतील अर्धा किलाे साेने मालेगावातून हस्तगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव (जि. नाशिक)- नवी मुंबईतील बँक अाॅफ बडाेदाच्या दराेड्यात चाेरीला गेलेल्या मुद्देमालापैकी अर्धा किलाे साेने मालेगाव  शहरातून हस्तगत करण्यात अाले. सानपाडा पाेलिसांच्या पथकाने साेमवारी सकाळी संगमेश्वर भागातून राजेंद्र वाघ या सराफ कारागिरास अटक करून मुद्देमाल जप्त केला. १३ नाेव्हेंबर राेजी जमिनीत भुयार खाेदून नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर ११ मधील बँक अाॅफ बडाेदाच्या शाखेतील ३० पैकी २८ लाॅकर्स दराेडेखाेरांनी फाेडले हाेते.   


दराेड्यात साेने, चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांचा ३ काेटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल चाेरीस गेल्याची नाेंद सानपाडा पाेलिस ठाण्यात झाली अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले अाहे. चाेरीनंतर चाेरट्यांनी साेने अापसात वाटून घेतले हाेते. अटकेतील संशयितांकडून चाेरीचे साेने मालेगाव शहरात विक्री केल्याची माहिती मिळाल्याने सानपाडा पाेलिसांनी चार पथकाच्या मदतीने सकाळपासून शहरात शाेधमाेहीम सुरू केली हाेती. दागिने तयार करणाऱ्या कारागिराला साेने विकल्याची माहिती असल्याने शहरातील काही सराफ दुकानांमध्ये चाैकशी करण्यात अाली. संगमेश्वरातील राजेंद्र वाघ या कारागिराकडे संशयाची सुई गेल्याने पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. या वेळी वाघने घरात लपवून ठेवलेले अर्धा किलाे वजनाचे साेने पाेलिसांना काढून दिले. पाेलिस निरीक्षक व्ही. एन. साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...