आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barrier For The Herbal Park Construction In Nashik

वनौषधी उद्यान उभारणीस ‘वनविकास’चा अडथळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पांडवलेणी येथे वनौषधी उद्यान उभारण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वनविकास महामंडळाच्या अडथळ्यांमुळे ‘ब्रेक’ लागल्याचे िचत्र असून, अाता महापालिकेनेही वनविकास महामंडळापुढे लाेटांगण घालत अटी बदलण्यासाठी महासभेवर फेरप्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू केली अाहे.

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेले उद्यान खासगीकरणातून विकसित करण्याचा प्रस्ताव ठाकरे यांनी ठेवला हाेता. त्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही जागा वनविकास महामंडळाकडून तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेला हस्तांतरित करण्याचे अादेश दिले. त्यानुसार, महापालिकेने वनविकास महामंडळाशी करार करून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया बाकी अाहे. यासंदर्भात महासभेने अटी-शर्ती तयार करून महासभेवर मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला हाेता. महासभेने नुकतीच मान्यता िदल्यावर टाटा कन्सलटन्सीशी अंतिम कराराची प्रक्रिया पूर्ण हाेणार हाेती. दरम्यान, वनविकास महामंडळाने करारातील काही अटींना अाक्षेप घेतल्यामुळे अाता महापालिकेला फेरप्रस्ताव महासभेवर ठेवणे क्रमप्राप्त झाले अाहे.