आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट्सअॅप काॅलिंगला अडथळेच अधिक, सुविधा असूनही उपयाेग नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्हाॅट्सअॅपने व्हॉइस काॅलिंगची सुविधा सुरू केली खरी. परंतु, टूजी नेटवर्किंगच्या यूजर्सला काॅल जाेडणीत असंख्य अडचणी येत असल्याने आता ‘भीक नकाे, पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ या यूजर्सवर आली आहे. शिवाय व्हाॅट्सअॅप काॅलच्या नादात इंटरनेटचा डाटाही माेठ्या प्रमाणात खर्च हाेत असल्याने आठवड्यातच या सुविधेची हवा गुल झाली आहे.
तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या व्हाॅट्सअॅपने व्हॉइस काॅलिंगची सुविधा िदल्यानंतर बहुतांश जणांनी आपले अॅप्लिकेशन अपडेट करून घेतले. प्रत्यक्षात यात अडचणीच अधिक येत असल्याचा अनुभव आहे. टूजी नेटवर्कची सुविधा असलेल्यांना या सुविधेचा उपयाेग हाेत नसल्याचे दिसते. संबंधितांनी व्हाॅट्सअॅप काॅल करण्याचा प्रयत्न केल्यास समाेरच्याला केवळ मिसकाॅल जाताे. परंतु, काॅल जाेडला जात नाही. काहींचे काॅल्स जाेडले जातात, परंतु त्यातून आवाजच येत नाही.

पुढे वाचा... पूर्वीपेक्षा अधिक डाटा