आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे-भाजपमध्ये पाण्याचे ‘पत्रक वाॅर’, लाेकप्रतिनिधींच्या बेफिकीरीचा समाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी साेडताना दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपच्या पालकमंत्र्यांपासून, तर अामदारांपर्यंत सर्वांच्या बेफिकिरीचा समाचार घेणारे पत्रक मनसेने घराेघरी वाटपास प्रारंभ केला असून, महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर मनसे भाजपतील ‘पत्रक वाॅर’ भडकण्याची चिन्हे अाहेत.

मराठवाड्याला पाणी देण्यावरून वाद झाला होता. मराठवाड्याला दारणा धरणातून पाणी देण्याची मागणी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी केली होती. जलसंपदा खाते पालकमंत्री महाजनांकडे असतानाही नाशिकचे पाणी थांबू शकले नाही. त्यावेळी भाजप अामदारही गप्प बसल्याने माेठी टीका झाली हाेती. त्यावर भाजपच्या बेफिकिरीचा समाचार घेणाऱ्या बातम्या वर्तमानपत्रात अाल्या हाेत्या. या बातम्यांची कात्रणे मथळे एकत्रित करून मनसेने पत्रक काढले अाहे. या पत्रकात इतिहासात प्रथमच भाजपमुळे नाशिककरांना माेठ्या पाणीकपातीचा सामना करावा लागला. अाता जपून पाणी वापरावे, असे अावाहन करून संकटमाेचकाची भूमिकाही मनसेकडून बजावली जात असल्याचे अधाेरेखित करण्यात अाले अाहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडण्यात अाले. याकडे भाजपच्या लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. याचा समाचार घेणाऱ्या पत्रकांचे मनसेतर्फे शहरात वाटप सुरू अाहे. यामध्ये वर्तमानपत्रातील भाजपविराेधातील बातम्यांचे मथळे एकत्र दिले अाहेत.

शहरात अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद झाल्यावर मनसेने दहा टँकर सुरू केले असून, ज्या साेसायट्यांमध्ये कमी दाबाने वा पाणीच येत नाही तेथे संपर्क साधल्यावर टँकर पाेहोचत अाहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल १७ लाख ८० हजार लिटर पाणी मनसेच्या टँकरद्वारे नाशिककरांना पाेहोचवले गेले अाहे. हजाराहून अधिक फेऱ्या झाल्या असून, गुरुवारी पाणी बंद असताना ७७ फेऱ्यांद्वारे बाेअरवेल, विहिरींतील पाणी वाटप केल्याचे नाशिक मध्यचे निरीक्षक सचिन भाेसले यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेचे पाणी वापरले जात असले, तरी लाेकांना माेफत दिले जाते त्यांची पाण्यासाठी हाेणारी भटकंतीही थांबवण्याचा प्रयत्न असल्याचे भाेसले यांनी स्पष्ट केले.