आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती कार्यालयाला पाेलिसांचे सील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५७ लाखांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर केले असता २९ तारखेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात अाली. दरम्यान, पथकाने बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयातील पुरावे गहाळ हाेऊ नये, यासाठी सील ठाेकले. तसेच, जिल्हा बँकेच्या शाखेतील सीसीटीव्ही फुटेज अाणि व्यवहाराचा तपशील पथकाकडून जमा केला जात अाहे. या रकमेचे धागेदाेरे बाजार समितीच्या 'बड्या' पदाधिकाऱ्यापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता असून, त्या दिशेनेही पाेलिस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २५) सायंकाळी वाजता अारटीअाे चाैक ते अश्वमेधनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचण्यात अाला हाेता. समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या देयक इतर बिलांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून सुमारे ५७ लाखांची रक्कम परस्पर काढून घेतल्याची तक्रार विभागाला प्राप्त झाली हाेती. त्यानुसार स्विफ्ट डिझायर कार (एमएच १५ पीएम २१८०) काैशल्य-सुमंगल हाॅलच्या गाळ्यासमाेर अडवून झडती घेतली. त्यात सुमारे ५७ लाखांची रक्कम सापडली. कारमधील बाजार समितीचे लेखाधिकारी अरविंद हुकूमचंद जैन, टंकलेखक विजय सीताराम निकम लिपिक दिगंबर हिरामण चिखले या तिघांची रात्री उशिरापर्यंत पथकाने चाैकशी केल्यावर ही रक्कम बेहिशाेबी असल्याचे लक्षात येताच तिघांाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला.

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता गुन्ह्याचे गांभीर्य पाहता विशेष पथकाची नियुक्ती
ही रक्कम समितीच्या एका 'बड्या' पदाधिकाऱ्याच्याच सांगण्यावरून त्याच्या घरी जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली अाहे. त्याबाबतचे अधिकृत पुरावे हाती लागत नसले तरी गुन्ह्याचे गांभीर्य राजकीय हस्तक्षेप हाेण्याची शक्यता लक्षात घेता पथकाचे अधीक्षक उगले यांनी स्वतंत्र पथकाकडे तपास साेपविला. अपर अधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्यासह पथकाची नियुक्ती करण्यात अाली अाहे.

सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे जमा
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय ते जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढण्यापर्यंत केलेले व्यवहार, भरलेल्या स्लीप यासह इतर कागदपत्रांचा दस्तावेज तपासणी गरजेची अाहे. समितीच्या प्रशासकीय कार्यालयातही अावश्यक पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सील करण्यात अाले. बँकेचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात अाले असून, या गुन्ह्यात अाणखी काेणाचा सहभाग अाहे, हे शाेधण्यासाठी तीन दिवसांच्या पाेलिस काेठडीत तपास केला जाणार अाहे. - पंजाबराव उगले, पाेलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...