आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beating In Election, Woman Corporator In Hospital

निवडणुकीमध्ये हाणामारी, नगरसेविका रुग्णालयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरसेविका सिंधूताई मधे यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन जाताना महिला पोलिस. - Divya Marathi
नगरसेविका सिंधूताई मधे यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन जाताना महिला पोलिस.
त्र्यंबकेश्वर - पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी बुधवारी (दि. १७) झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया हाेण्यापूर्वी नगरसेवक अापल्या बाजूने वळविण्याच्या वादातून जाेरदार धक्काबुक्की हाणामारी झाली. त्यात कॉँग्रेसच्या नगरसेविका सिंधूताई दत्ता मधे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारार्थ नाशिकला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. दरम्यान, या सर्व गाेंधळात झालेल्या नगराध्यक्ष निवड प्रक्रियेत मनसेच्या अनघा नारायण फडके यांनी नऊ मतांसह विजय मिळविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी तृप्ती धारणे यांना आठ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे संतोष कदम ललित लोहगावकर यांच्यात लढत झाली. कदम यांना एक मत जादा मिळाल्याने उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या आधीच्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी गटातील अपक्ष नगरसेविका विजया दीपक लढ्ढा यांनी मनसे गटाला सहाय्य केल्याने मनसेला नगराध्यक्षपद मिळविता अाले. यात आमदार वसंत गिते यांनी मुख्य भूमिका बजावल्याचेही सांगण्यात आले. निवडणुकीसाठी ते समर्थक कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. मतदानाच्या वेळी अनघा फडके यांच्याकडे धनंजय तुंगार (अपक्ष), विजया लढ्ढा (अपक्ष), आशा झोंबाड, यशोदा अडसरे, योगेश तुंगार, अभिजित कान्नव, यशवंत भोये हे मनसेचे सदस्य, तर तृप्ती धारणे यांच्याकडे अंजना कडलग, सिंधूताई मधे, शंकुतला वाटाणे, रवींद्र सोनावणे (राष्ट्रवादी), ललित लोहगावकर (कॉँग्रेस), अलका शिरसाट (राष्ट्रवादी) असे बलाबल होते. फडके यांना लढ्ढा यांचे एक मत जादा मिळाल्याने त्या विजयी झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

अधिकाऱ्यांनी काढली समजूत : दरम्यान,पालिका सभागृहात दोन्ही गटांच्या नगरसेवकांचा प्रवेश होण्यापूर्वी मोकळ्या जागेत सदस्य फोडण्यावरून समर्थकांच्या प्रवेशावरून जोरदार धक्काबुक्की हाणामारी झाली. या वेळी कॉँग्रेसच्या सदस्या सिंधूताई मधे यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तत्काळ नाशिक येथे हलविण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. भाजपच्या तृप्ती धारणे, अलका शिरसाट, मधे, कडलग यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पीठासीन अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक प्रवीण मुंडे यांनी उपस्थित सदस्यांची समजूत काढली. निवडणूक प्रक्रिया मतदान करून घ्या, काही तक्रारी असतील तर त्या नंतर दाखल करा, असे सांगितले.

धारणे यांच्या विराेधी मतदानाची परतफेड
भाजपच्याएकमेव अविरोध निवडून आलेल्या नगरसेविका तृप्ती धारणे यांनी राष्ट्रवादीच्या चार, कॉँग्रेसच्या तीन, एक अपक्ष अशा नऊ सदस्यांना हवाई सफर घडविली हाेती. धारणे या प्रथम मनसे गटात होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांनी गटविरोधी मतदान केल्याने अलका शिरसाट निवडून आल्या होत्या. त्याचीच परतफेड या निवडणुकीत करण्यात अाल्याचे दिसून अाले.

ठळक घडामोडी
>दोन्हीगटांतील नगरसेवकांनी सहकाऱ्यांनी पालिकेत प्रवेश हमरी-तुमरी केल्याने वाढला वाद.
>पालिका सभागृहाचे दरवाजे या वादामुळे बंद करण्यात आले हाेते.
>सभागृहात जाण्यास पत्रकारांना राेखण्यात आले.
>दोन्ही गटांचे समर्थक पालिकेसमाेरील दोन्ही रस्त्यांवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची अातषबाजी जल्लाेष केला.
>विजयी दाेन्ही उमेदवारांची या वेळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.