आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासुरवाडीस मारहाण झाल्याने शिक्षक पतीची आत्महत्या, पत्नीवर छळाचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पत्नीच्या छळाला कंटाळून शिक्षक पतीने अंबड येथे राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपविली. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या निष्पाप व्यक्तीवर अशी वेळ यावी, अशा शब्दांत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला असून, पत्नीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणारे शिवाजी लक्ष्मण पावले (३०, रा. अंबड) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
त्यांची पत्नी कुसुम ऊर्फ ताईबाई शिवाजी पावले पतीशी वाद घालून माहेरी सिन्नर येथे निघून गेली होती. त्यानंतर कौटुंबिक वाद मिटावा म्हणून कुसुम पावले यांच्या वडिलांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. दरम्यान, शनिवारी (दि. २४) शिवाजी पावले यांना सासरे विठोबा भिकाजी पोमनर, सासू चंद्रकला विठोबा पोमनर, मेव्हणा संजय विठोबा पोमनर, सोमनाथ विठोबा पोमनर यांनी सिन्नर येथे बोलावून मारहाण केली. त्यात ते जखमी झाले होते. त्यांनी सिन्नर पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र, पुन्हा मारहाण होण्याच्या भीतीमुळे मानसिक धक्का बसलेल्या घाबरलेल्या शिवाजी पावले यांनी जीवनाचा अंत केला. त्यांची पत्नी संशयित आरोपी कुसुम पावले हिने शिवाजी पावले त्यांच्या नातेवाइकांवर खाेटीत्रास दाखल केली असून त्यामुळेच सर्वांना त्रास झाल्याचे बाेलले जात अाहे. पावले यांनी त्यांच्या मृत्यूस पत्नी, सासू, सासरे, मेव्हणे जबाबदार आहेत, असे शिवाजी पावले यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. या प्रकरणी संतोष पावले यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...