आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपूर्व अनुभवामुळे जिंकण्याची जिद्द अधिकच दृढ : कविता राऊत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी जेव्हा अामच्याशी बाेलले, त्यावेळी अामच्यातील प्रत्येकालाच मनाेमन अानंद झाला. त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे एक नवी प्रेरणा अाणि प्रचंड उत्साह संचारला असून, प्रत्येकाच्या मनात देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची असलेली जिद्द अधिकच दृढ झाली असल्याचे नाशिकची अाॅलिम्पियन मॅरेथाॅन धावपटू कविता राऊत-तुंगारने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. दिल्लीत सर्व अाॅलिम्पिकवीरांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात अाले. या साेहळ्यातील सन्मानानंतर कविता राऊतशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधल्यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.

देशाचे पंतप्रधान प्रत्येक अाॅलिम्पिकपटूला स्वत: भेटून त्याची विचारपूस करीत असल्याचे दृश्य या देशाने प्रथमच अनुभवले. त्यामुळे अामच्यासारख्या प्रथमच अाॅलिम्पिकपर्यंत पाेहाेचलेल्या खेळाडूंप्रमाणेच यापूर्वीदेखील अाॅलिम्पिकला जाऊन अालेल्या खेळाडूंसाठीदेखील हा एक वेगळाच अनुभव हाेता. देशाचे पंतप्रधान अगदी खेळीमेळीत अापल्याशी हितगूज साधत असल्याची भावनाच सगळ्यांना अानंद देणारी हाेती.

प्रत्येक देशाच्या नागरिकांसमाेर अापल्या देशाचा तिरंगा झेंडा अभिमानाने फडकवण्याची संधी अाॅलिम्पिकमध्येच मिळू शकते. त्यामुळे ही संधी साधून तुम्ही देशाचे नाव जगात उज्ज्वल करण्याचा पंतप्रधानांनी दिलेला संदेश अाम्हाला सर्वाेत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही कविताने नमूद केले. जागतिक स्तरावर खेळणारे खेळाडू हे केवळ खेळण्यासाठी नसून ते या देशाचे प्रतिनिधित्वच करीत असल्याने त्या सगळ्याची जाण ठेवूनच अापल्या ध्येयाला गाठण्याचा सल्लादेखील त्यांनी दिल्याचे कविताने सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या संवादानंतर प्रत्येक खेळाडूच भारावून गेला हाेता, असेही कविताने नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...