आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिअरचा कंटेनर उलटला, मद्यप्रेमींकडून बाटल्यांची लूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ नाशिकच्या दिशेने जाणारा बिअर बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने लाखो रुपये किमतीच्या बिअर बाटलीची खोकी रस्त्यावर विखुरली गेली. ही बातमी गावात पसरताच संधी साधत अनेकांनी नेता येतील तेवढ्या बिअरच्या बाटल्या खोकी पळवली.

बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाला गतिरोधक लक्षात आल्याने त्याने अचानक ब्रेक दाबला. अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे गाडी लॉक होऊन दुभाजकावर जाऊन उलटली. ट्रकमध्ये नॉक आउट कंपनीच्या बिअरच्या बाटल्यांचे खोके होते. ट्रक उलटल्याने बाटल्या असलेली खोकी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरली होती. ही बातमी गावात पसरताच नागरिकांनी बिअरची खोकी पळवली. मात्र, पोलिस अपघातस्थळी पोहोचूनही ही लूट ते थांबवू शकले नाही. आपल्या ट्रकमधील माल लुटला गेल्याचे ट्रक ड्रायव्हर मधुकर आहेर हताशपणे पाहत बसला होता. अपघात घडल्यानंतर मदत करायचे सोडून फुकट मिळणार्‍या बिअरच्या बाटल्या गोळा करण्यात अनेकांनी धन्यता मानली. मिळेल त्या साधनाने या बिअरच्या बाटल्या पळवल्या गेल्या.

(फोटो : येवल्याजवळ ट्रक उलटल्याने बिअरच्या बाटल्या अशा रस्त्यावर पडल्या होत्या)