आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिग्रीपूर्वीच दोघांना लाखांचे पॅकेज..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंजिनिअरिंगकॉलेजेसमध्ये सध्या कॅम्पस इंटरव्ह्यूचा चांगलाच जोर असून, शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत आहेत. के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्येदेखील आतापर्यंत अशाप्रकारे १६० विद्यार्थ्यांची निवडही झाली आहे. त्यात दोघांना प्रत्येकी तब्बल साडेसात लाख रुपयांचे पॅकेजही निश्चित झाले आहे. म्हणजेच शिक्षण पूर्ण होताच महिन्याकाठी ६२ हजार रुपये पगाराची नोकरी या दोघांच्या स्वागतासाठी तयार असेल.
इंजिनिअरिंगच्या चाैथ्या वर्षात म्हणजेच अखेरच्या वर्षी विद्यार्थ्यांना वेध लागतात ते कॅम्पस इंटरव्ह्यूचे. यंदा के. के. वाघ महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १६० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात केपीआयटी टेक्नोमध्ये ४३ तर, एल अँड टीमध्ये १९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. परीक्षेला जूनपर्यंत अवधी असल्याने नोकरी लागलेल्यांची संख्या ३०० पर्यंत जाईल, अशी अपेक्षा महाविद्यालयाचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी. के. शहाबादकर यांनी सांगितले.

महाविद्यालयांमध्येस्वतंत्र सेल :बहुतांश कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट सेल वा कमिटी असते. जी प्लेसमेंटची प्रक्रिया हाताळते. महाविद्यालयांतील सर्वात वरिष्ठ प्रोफेसर या कमिटीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी नेमके कोणते कौशल्य लागते ते आपल्या विद्यार्थ्यांना कसे शिकवता येईल, यासाठी हे सेल सतत कार्यरत असतात. ‘सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेण्ट’ किंवा ‘कॉर्पोरेट रेडीनेस प्रोग्रॅम' या नावाने विविध उपक्रम वर्षभर महाविद्यालयांमध्ये राबवले जातात. बायोडेटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी, तिथे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे कशी द्यावीत, व्यक्तिमत्त्व विकास, विश्लेषणात्मक आणि बारकाईने विचार कसा करावा याचे ट्रेनिंग दिले जाते.

अशीराबविली जाते प्रक्रिया : कॅम्पसप्लेसमेंटसाठी आलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. याला प्री-प्लेसमेन्ट डिस्कशन म्हणतात. यामुळे प्रतिनिधींशी चर्चेची संधी विद्यार्थ्यांना मिळते. शिवाय ज्या कंपनीच्या मुलाखतीला जायचे आहे त्याचा इतिहास, विकास, भविष्यातले आराखडे डेव्हलपमेंट प्लॅन अशी माहिती मिळते. याचा फायदा आपण नक्की कंपनीतल्या कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो, याची संपूर्ण तयारीच या प्री प्लेसमेंट डिस्कशनमध्ये होते. कंपनीची माहिती मिळाल्यावर इलीजीबिलीटी टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि नंतर वैयक्तिक मुलाखत फेरी असते. या मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी निश्चित होते.
या दोघांची झाली चांदी
के.के. वाघ इंजिनिअरिंगमधील अस्मिता गाैतम मुकेश बारसाखळे या दोन विद्यार्थ्यांना एन-विडिया कंपनीने प्रत्येकी साडेसात लाखांचे पॅकेज देऊ केले आहे. या महाविद्यालयातील आतापर्यंतचे हे सर्वाेच्च पॅकेज आहे.

शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीचा आनंद
-माझीकेपीआयटी कंपनीत निवड झाली आहे. आवडत्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण होण्याआधीच नोकरी मिळाल्याचा आनंद आहे. स्नेहलआहेर, विद्यार्थिनी

संधीमुळे जबाबदारीची जाणीव वाढली
-माझीपर्सिस्टंट कंपनीत निवड झाली आहे. पहिली नोकरी मिळण्याच्या आनंदासोबत जबाबदारीची अधिक प्रकर्षाने जाणीव झाली. गायत्रीदेशमुख, विद्यार्थी

-नाशिकमध्येही भरपूर संधी आहे. स्थानिक कंपन्यांनी वेळेत मुलाखती घेतल्यास नाशिकमध्येही अनेकांना नोकऱ्या मिळू शकतात. पी.के. शहाबादकर, ट्रेनिंगअ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर, के. के. वाघ महाविद्यालय